...तर होणाऱ्या पत्नीला अश्लील संदेश पाठवण्यात गैर नाही!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 20, 2021 | 13:58 IST

Lewd Messages To Fiancee Donot Insult Modesty Says A Mumbai Session Court होणाऱ्या पत्नीला होणाऱ्या पतीने अश्लील संदेश पाठवला आणि महिलेला त्यावेळी त्यात आक्षेप घ्यावा असे वाटले नसेल तर त्यात काही गैर नाही. हे मतप्रदर्शन मुंबईच्या सेशन कोर्टाने एका खटल्याच्या सुनावणीत व्यक्त केले.

Lewd Messages To Fiancee Donot Insult Modesty Says A Mumbai Session Court
...तर होणाऱ्या पत्नीला अश्लील संदेश पाठवण्यात गैर नाही! 
थोडं पण कामाचं
  • ...तर होणाऱ्या पत्नीला अश्लील संदेश पाठवण्यात गैर नाही!
  • मतप्रदर्शन मुंबईच्या सेशन कोर्टाने एका खटल्याच्या सुनावणीत व्यक्त केले
  • पुरुषाची इच्छा लग्न करण्याची होती, पण...

Lewd Messages To Fiancee Donot Insult Modesty Says A Mumbai Session Court मुंबईः होणाऱ्या पत्नीला होणाऱ्या पतीने अश्लील संदेश पाठवला आणि महिलेला त्यावेळी त्यात आक्षेप घ्यावा असे वाटले नसेल तर त्यात काही गैर नाही. हे मतप्रदर्शन मुंबईच्या सेशन कोर्टाने एका खटल्याच्या सुनावणीत व्यक्त केले. एका ३६ वर्षांच्या पुरुषाला कौटुंबिक कारणामुळे आयत्यावेळी लग्न करता आले नाही. पुढे दोन्ही व्यक्तींमध्ये तणाव वाढला. यातूनच मग पुरुषाविरोधात लग्न होण्याआधी पाठवलेल्या अश्लील संदेशाचे निमित्त करुन गंभीर आरोप करण्यात आले. लग्नाचे वचन देऊन फसवणूक करणे आणि बलात्कार करणे असे आरोप करण्यात आले. या प्रकरणात २०१० मध्ये गुन्हा दाखल झाला आणि २०२१ मध्ये कोर्टाचा निर्णय आला.

वेबसाइटच्या माध्यमातून भेट झाली आणि २००७ मध्ये लग्न करायचे ठरले. पण पुरुषाच्या आईचा विशिष्ट मुद्यावरुन विरोध असल्यामुळे लग्न झाले नाही. यानंतर दोन्ही व्यक्तींमध्ये तणाव निर्माण झाला आणि २०१० मध्ये पुरुषाविरोधात महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या आणि सर्व साक्षी-पुरावे बघून निर्णय दिला.

पुरुषाची इच्छा लग्न करण्याची होती. या दृष्टीने त्याने तयारी पण केली होती. आर्य समाजाच्या हॉलमध्ये लग्नासाठी तो मंगळसूत्र घेऊन गेला होता. पण लग्नानंतर कुठे राहावे या मुद्यावरुन वाद झाला. या नंतर पुरुषाच्या आईने विरोध केला. कौटुंबिक दबावाला बळी पडल्यामुळे त्याने आयत्यावेळी माघार घेतली. या प्रकरणात कौटुंबिक दबाव लग्न न होण्याला कारणीभूत ठरला आहे. पुरुषाने महिलेची लग्नाचे वचन देऊन फसवणूक केल्याचे दिसत नाही. तो कौटुंबिक दबाव हाताळण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. 

लग्न होण्याआधी दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. पण हे दोघांच्या मर्जीने घडत होते. यामुळे तत्कालीन घडामोडींवरुन पुरुषाने फसवणूक केली आणि बलात्कार केला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. यामुळे महिलेचा सन्मान राखून कोर्ट पुरुषाला आरोपामुक्त करत आहे; अशा स्वरुपाचा निकाल देण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी