Shivsena Leader Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकारणात हादरे देणारे शिवसेनेच्या बंडाळी नेत्यांची यादी

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 21, 2022 | 15:44 IST

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेला आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरे जावे लागत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची बतावणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे.

List of Shiv Sena rebel leaders
शिंदेसोबत सरकारला हादरे देणारी बंडखोर नेत्यांची यादी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला
  • एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार

Shivsena Leader Eknath Shinde : राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेला आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरे जावे लागत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची बतावणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान एकनाथ शिंदेंनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे हे हादरे भूकंप करणार की फक्त 440 चा झटका देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या काही आमदारांच्या गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. 

एकनाथ शिंदेंसोबत सूरतमध्ये कोणते आमदार? पहा यादी 

मुंबई

1. मागााठाणे आमदार प्रकाश सुर्वे

मराठवाडा 

1. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
2. पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
3. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
4. कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
5. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
6. नांदेडचे बालाजी कल्याणकर

कोकण 

1. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
2. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
3. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले

पश्चिम महाराष्ट्र 

1. आटपाडीचे आमदार अनिल बाबर
2. भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
3. पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
4. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
5. साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे

ठाणे  

1. अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
2. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
3. भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
4. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर

उत्तर महाराष्ट्र  

1. पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील

विदर्भ 

1. मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
2. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड

जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम 

काल संध्याकाळी 5 वाजता एकनाथ शिंदेंसब सर्व आमदारांनी प्लानिंग करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतून सूरतला जाणाऱ्या फ्लाईटचं बुकिंग करण्यात आलं. त्यासोबतच, एअरपोर्टजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आलं. सर्वात आधी 11 विधेयक रात्री वाजेपर्यंत सूरतमधील हॉटेलमध्ये पोहोचले. त्यापाठोपाठ दीड वाजता एकनाथ शिंदेंसह आणखी काही आमदार हॉटेलमध्ये पोहोचले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंसोबत 25 ते 30 शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. सूरतमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना मदत केली. त्यासोबत सूरत पोलिसांनी रात्री याप्रकाराची माहिती देण्यात आली. त्यानंतर सकाळी 5 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी