राज्य मंत्रिमंडळ विस्तार: पाहा कोण आहेत १३ नवे मंत्री

मुंबई
Updated Jun 16, 2019 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Cabinet Expansion: मुंबईतील राजभवन परिसरात आज (रविवार) १३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी भाजपचे १०, शिवसेनेचे दोन आणि आरपीआयचे १ मंत्री शपथ घेणार आहेत.

Devendra_fadnavis_narendra modi_twitter
राज्य मंत्रिमंडळ विस्तार: पाहा कोण आहेत १३ नवे मंत्री  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा आणि अखेरचा विस्तार आज (रविवार) पार पडला. राजभवन परिसरात एकूण १३ नव्या मंत्र्याचा शपथविधी झाला. यापैकी १० भाजपचे २ शिवसेनेचे आणि १ आरपीआयचा मंत्री आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे. कारण की, आतापर्यंत विखेंचा भाजपमध्ये थेट प्रवेश झाला नव्हता. पण आज त्यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये गेलेल्या विखेंना आता मोठं खातं मिळणार असल्याचं सध्या बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना कृषी खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.  

विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळेस प्रादेशिक समतोल आणि जातीय समीकरणं लक्षात घेऊनच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. यावेळी भाजप १० नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करत असल्याने काही विद्यमान मंत्र्यांना नारळ देण्यात आला आहे.  

मंत्रिमंडळात या १३ नव्या मंत्र्यांचा समावेश  

 1. राधाकृष्ण विखे-पाटील (कॅबिनेट मंत्री) 
 2. जयदत्त क्षीरसागर (कॅबिनेट मंत्री)  
 3. आशिष शेलार (कॅबिनेट मंत्री) 
 4. डॉ. संजय कुटे (कॅबिनेट मंत्री) 
 5. सुरेश खाडे (कॅबिनेट मंत्री) 
 6. अनिल बोंडे (कॅबिनेट मंत्री) 
 7. अशोक उईके (कॅबिनेट मंत्री) 
 8. तानाजी सावंत (कॅबिनेट मंत्री) 
 9. योगेश सागर (राज्यमंत्री)
 10.  अविनाश महातेकर (राज्यमंत्री)
 11.  संजय भेगडे (राज्यमंत्री)
 12.  परिणय फुके (राज्यमंत्री)
 13.  अतुल सावे (राज्यमंत्री)

पाहा शपथविधी सोहळा

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर सध्या संपूर्णपणे वरचष्मा हा मुख्यमंत्र्यांचा दिसून येत आहे. कारण की, शेवटच्या क्षणापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. तसंच अद्यापही कोणत्याही मंत्र्याला कोणतं खातं दिलं जाणार याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळेच आता मंत्रिपदासोबत कुणाला कोणती खाती मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

LIVE UPDATE: 

 1. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना महत्त्वाचं खातं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती
 2. राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा आणि शेवटचा विस्तार पार पाडला. एकूण १३ नव्या मंत्र्यांनी घेतली शपथ
 3. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील भाजपचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रिपदाची शपथ 
 4. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुकेंनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ 
 5. मावळ मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले संजय भेगडे यांनाही राज्यमंत्रिपदाची शपथ
 6. रिपाइंचे अविनाश महातेकर यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ 
 7. मुंबईतील चारकोपचे भाजपचे योगेश सागर यांना राज्यमंत्रिपदाची शपथ 
 8. शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
 9. भाजपचे अशोक उईके यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 
 10.  अमरावतीच्या मोर्शीचे आमदार अनिल बोंडे यांनी घेतली शपथ
 11.  भाजपच्या सुरेश खाडे यांनाही मंत्रिपदाची शपथ
 12.  डॉ. संजय कुटे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
 13.  आशिष शेलार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली 
 14.  शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
 15.  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली शपथ
 16.  शपथविधी सोहळ्याला सुरुवात 
 17.  केंद्रीय राज्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील शपथविधी सोहळ्याला हजर
 18.  शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांची राज्य नियोजन आयोगावर वर्णी, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
 19.  राज्यपाल सी. विद्यासागर राव देणार नव्या मंत्र्यांना शपथ  
 20.  पत्रकारांनी महातेकरांची ओळख करुन दिल्यानंतरच पोलिसांनी त्यांना आत सोडलं 
 21.  मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी राजभवन येथे पोहचलेल्या आरपीआयचे अविनाश महातेकर यांना पोलिसांनी प्रवेशद्वारापाशी अडवलं.
 22.  मंत्रिमंडळ विस्तार थोड्याच वेळात, ११ वाजता शपथविधी सोहळ्याला होणार सुरुवात

एकीकडे भाजप विधानसभेच्या दृष्टीने सगळी मोर्चेबांधणी करत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या हाती त्यांनी फार काही लागू दिलं नाही. कारण की, त्यांचे फक्त दोनच मंत्री शपथ घेणार असल्याचं समजतं आहे. शिवसेनेचं एक मंत्रिपद आधीच रिक्त आहे. त्यामुळे आपल्याला तीन मंत्रिपदं मिळावीत अशी मागणी शिवसेनेने केली होती. पण सध्या तरी त्यांना दोनच मंत्रिपद मिळाली असल्याची माहिती समजते आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेला मंत्रिमंडळ विस्तार हा फारच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आगामी निवडणुकीत अनेक राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज्य मंत्रिमंडळ विस्तार: पाहा कोण आहेत १३ नवे मंत्री Description: Cabinet Expansion: मुंबईतील राजभवन परिसरात आज (रविवार) १३ नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यावेळी भाजपचे १०, शिवसेनेचे दोन आणि आरपीआयचे १ मंत्री शपथ घेणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles