Load Shedding in Maharashtra : राज्यात होणार लोडशेडिंग, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती, राज्यातील या भागात होणार बत्ती गुल

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोडशेडिंग होणार अशी चर्चा होती. परंतु आता राज्यात लोडशेडिंग होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्याला ज्या प्रमाणात वीज हवी आहे. त्या प्रमाणात वीज मिळत नाहिये त्यामुळे भारनियमन करावे लागत असल्याचे राऊत म्हणाले. तसेच मागणीएवढी वीज जर राज्याला मिळाली तर भारनियमन होणार नाही असेही राऊत म्हणाले.  

nitin raut
ऊर्जामंत्री नितीन राऊत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोडशेडिंग होणार अशी चर्चा होती. परंतु आता राज्यात लोडशेडिंग होणार आहे
  • राज्याला ज्या प्रमाणात वीज हवी आहे. त्या प्रमाणात वीज मिळत नाहिये त्यामुळे भारनियमन करावे लागत असल्याचे राऊत म्हणाले.
  • मागणीएवढी वीज जर राज्याला मिळाली तर भारनियमन होणार नाही असेही राऊत म्हणाले.  

Load Shedding Maharashtra : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोडशेडिंग होणार अशी चर्चा होती. परंतु आता राज्यात लोडशेडिंग होणार आहे अशी अधिकृत माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्याला ज्या प्रमाणात वीज हवी आहे. त्या प्रमाणात वीज मिळत नाहिये त्यामुळे भारनियमन करावे लाग असल्याचे राऊत म्हणाले. तसेच मागणीएवढी वीज जर राज्याला मिळाली तर भारनियमन होणार नाही असेही राऊत म्हणाले.  राज्याच्या कुठल्या भागात भारनियमन होणार आहे याबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा राऊत म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कोळसा खाणीत आंदोलन झाले होते. डिझेलचे दर वाढले आहेत. रेल्वेमंत्री कोळसा पाठवण्यासाठी रेल्वे पाठवत नाही त्यामुळे कोळसा मंत्रालयानेही रेल्वेमंत्रालयाकडे बोट दाखवले आहे. केंद्र सरकारच्या नियोजनामुळे कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. अदानी कंपनीने तिरोडा प्लांटवरील पुरवठा बंद केला आहे. अदाणी आणि राज्य सरकारचा ३१०० मेगावॅटचा करार आहे, परंतु अदाणी कंपनीने केवळ १७६५ किलो मेगावॅटचा पुरवठा केला आहे. त्यामुळी वीजटंचाई निर्माण झाली आहे. तसेच जे एस डब्ल्य्यू कंपनीकडून १०० मेगावॅटची वीज राज्य सरकारला मिळत होती. जे एस डब्ल्य्यू कंपनीचा प्लांट बंद झाल्याने हा वीजपुरवठा बंद झाला. सीजीपीएल कंपनीसोबत ७६० मेगावॅट विजेचा करार झाला आहे, परंतु या कंपनीने ६३० मेगावॅट वीज दिली आहे. या विजेच्या तुटवड्यामुळे भारनियमन करावे लागणार आहे असे राऊत म्हणाले. 

तसेच खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही त्यामुळे हे भारनियमन कधीपर्यंत होईल हे सांगता येत नाही. राज्यातील नागरिकांची जपून वीज वापरावी. विजेच्या भारनियमनाचे वेळापत्रक लवकर वृत्तपत्र, सोशल मीडिया आणि मेसेजवरून ग्राहकांन कळवण्यात येईल असे राऊत यावेळी म्हणाले.

जर सरकारला १५०० मेगावॅट वीज मिळाली तर तत्काळ भारनियमन बंद करू. राज्याचे प्लांटही ८ हजार मेगावॅट निर्मितीच्या क्षमतेने सुरू आहेत. सध्या राज्याच्या प्लांटवर ७१०० मेगावॅट क्षमतेने सुरू आहे. जर या प्रकल्पांतून ८००० मेगावॅट वीज मिळाल्यास भारनियमन होणार नाही असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या भगात बिलं भरलेली नाहीत त्या भागात भारनियमन होणार आहे. ज्या भागात बिल वसूली झालेली नाही, ज्या भागात वीजचोरी होते त्याच भागात भारनियमन होणार आहे असेही राऊत यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी