Mumbai Local Mega Block : काय मुंबईकर फिरायला जाताय? मग एकदा बघा रेल्वेचं वेळापत्रक; मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई
भरत जाधव
Updated Sep 18, 2022 | 07:08 IST

मुंबईतील (Mumbai ) लोकल रेल्वेचं (Local Railway) वेळापत्रक बघून घ्या. कारण दर रविवारी रेल्वे विभागाकडून रेल्वे रुळांची दुरुस्ती, आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी काही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येत असतो.

Mumbai Local Mega Block
हार्बर मार्ग खुला तर मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक  
थोडं पण कामाचं
  • आज हार्बर मार्गावर आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही.
  • रेल्वे रुळांची दुरुस्ती, आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी ब्लॉक घेण्यात येत असतो.

Mumbai Local Mega Block : काय मुंबईकर आज रविवारी बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करताय, मग मुंबईतील (Mumbai ) लोकल रेल्वेचं (Local Railway) वेळापत्रक बघून घ्या. कारण दर रविवारी रेल्वे विभागाकडून रेल्वे रुळांची दुरुस्ती, आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी काही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येत असतो. ब्लॉक घेतल्यामुळे मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. आज कोण-कोणत्या मार्गावर ब्लॉग आहे हे जाणून घ्या. (Local Mega Block : No Megablock on Harbor route, Megablock on Central and Trans Harbour)

आज हार्बर मार्गावर आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला नाही. ट्रान्सहार्बर मार्गावर आणि मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या ट्रे्न्स भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाउन मार्गावर वळवल्या जातील.

Read Also : घरात 'या' दोन ठिकाणी कधीही लावू नये हनुमानचे फोटो

तर घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

Read Also : लोकांना अपेक्षित असणारे निर्णय सरकार घेणार: मुख्यमंत्री

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असेल. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत  वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत हार्बर/मेन मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी