नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या २१ जूनला प्रसिद्ध होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 11, 2022 | 10:13 IST

Local self-government bodies draft voter lists will be released on 21 June 2022 : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायती अशा २२१ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ जून २०२२ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील.

Local self-government bodies draft voter lists will be released on 21 June 2022
नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या २१ जूनला प्रसिद्ध होणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या २१ जूनला प्रसिद्ध होणार
  • २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायती अशा २२१ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या २१ जूनला प्रसिद्ध होणार
  • याद्यांवर २७ जून २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील

Local self-government bodies draft voter lists will be released on 21 June 2022 : मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील २०८ नगरपरिषदा आणि १३ नगरपंचायती अशा २२१ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ जून २०२२ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. या याद्यांवर २७ जून २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय विभाजनानंतर २१ जून २०२२ रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. हरकती व सूचना दाखल करण्याची प्रक्रिया २१ जून ते २७ जून २०२२ पर्यंत चालणार आहे. यानंतर १ जुलै २०२२ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ५ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी