Mega Block Update: उद्या घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

मुंबई
Updated Sep 21, 2019 | 14:47 IST

Mega Block 22nd September Update: उद्या रविवारी आहे, त्यामुळे उद्या जर का कोणी रेल्वेनं प्रवास करणार असेल तर त्यांनी ही बातमी नक्की वाचावी आणि त्यानंतर बाहेर जाण्याचा प्लान करावा.

mega block
उद्या घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • उद्याच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक बघूनच प्लान करा.
  • उद्या २२ सप्टेंबर, रेल्वे ट्रॅक, सिग्नल सिस्टम आणि ओव्हर हेड वायरची दुरूस्ती या आणि अशा विविध तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते मांटुगा, मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अशा मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. 

मुंबईः  उद्या रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. रविवारच्या दिवशी अनेक जणांचे बाहेर जाण्याचे प्लान ठरलेले असतात. पण त्यात आडकाटी येते ती, रविवारच्या मेगाब्लॉकची. त्यामुळे जर का तुम्ही उद्या बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर उद्याच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक बघूनच प्लान करा. त्यासाठी जाणून घ्या उद्याच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक. उद्या २२ सप्टेंबर, रेल्वे ट्रॅक, सिग्नल सिस्टम आणि ओव्हर हेड वायरची दुरूस्ती या आणि अशा विविध तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते मांटुगा, मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अशा मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. 

पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड या स्टेशन दरम्यान दोन्ही दिशेनं जाणाऱ्या फास्ट ट्रॅकवर रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०.३५ ते दुपारी २.३५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान फास्ट मार्गावरील लोकल ट्रेन स्लो मार्गावर सुरू असतील. 

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक 

उद्या रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड ते माटुंगा या रेल्वे स्थानकादरम्यान सीएसएमटीकडे सकाळी ११.१५ ते ३.४५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकल दिवा ते परळ स्थानकादरम्यान स्लो मार्गावर चालवण्यात येतील. तसंच या लोकल दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावतील. 

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक 

कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ११.१० ते ३.४० पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ पर्यंत सीएसएमटीहून वाशी ते पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्यात. सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सीएसएमटीच्या दिशेनं लोकल रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल विशेष लोकल धावणार आहेत. 

दुसरीकडे या ब्लॉकच्या काळात रत्नागिरी ते दादर पॅसेंजर एक्स्प्रेस दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. दादर ते रत्नागिरी पॅसेंजर एक्स्प्रेस दिवा स्थानकावरून सोडण्यात येणार आहे. यासाठी दादर स्थानकावरून दुपारी ३.४० वाजता दिवा लोकल चालवण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...