कुर्ल्याजवळ रेल्वे रूळावरून घसरली, मोठी दुर्घटना टळली

मुंबई
Updated May 26, 2019 | 23:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचे चाक घसरलं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या एका तासापासून रेल्वे खोळंबली आहे. सुदैवीनं मोठी दुर्घटना टळली आहे.

Mumbai Local Train (file photo)
लोकलचा एक डबा रूळावरून घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

मुंबई: मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या एका तासापासून खोळंबली आहे. मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचा एक डब्बा रूळावरून घसरल्याचं समजतं आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे.  मध्य रेल्वेच्या कुर्ला - विद्याविहार स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखीन जवळपास एक ते दीड तास लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

यामुळे जवळपास ६० लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. धिम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. लोकं आता रेल्वे ट्रॅकरून चालत जात स्टेशन गाठत आहेत. रात्रीची वेळ असल्यानं लोकं ट्रॅकवरून जाताना काळजी घेतली जात आहे. सर्व स्टेशनवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेय. सकाळपासून मेगाब्लॉक असूनही अशी घटना झाल्यानं लोकांमध्ये संताप पाहायला मिळतोय. 

गेल्या अनेक दिवसांपासुन रेल्वचं वेळापत्रक बिघडलेलं पाहायला मिळालं. रेल्वे रूळाला तडे जाणं, ओव्हर हेड वायर तुटणं आणि  इतर तांत्रिक बिघाडांमुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत होणं हे नेहमीच झालं आहे.

आजच पुण्याहून मुंबईला येणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन ठाणे स्टेशनवर बंद पडले. त्यामुळे जवळपास अर्धा तास रेल्वे स्थानकातच खोळंबली होती. अशातच संध्याकाळी मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय.   

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कुर्ल्याजवळ रेल्वे रूळावरून घसरली, मोठी दुर्घटना टळली Description: मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार स्थानकादरम्यान लोकलचे चाक घसरलं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या एका तासापासून रेल्वे खोळंबली आहे. सुदैवीनं मोठी दुर्घटना टळली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles