Rajesh Tope comment on Lockdown : ज्या दिवशी ८०० मे. टन ऑक्सिजनची मागणी येईल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 25, 2021 | 19:05 IST

Lockdown in Maharashtra only if daily oxygen (O2) demand touches 800 MT says Health Minister Rajesh Tope : ज्या दिवशी ८०० मे. टन ऑक्सिजनची मागणी येईल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात येईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. 

Maharashtra Health Minister Rajesh Tope
ज्या दिवशी ८०० मे. टन ऑक्सिजनची मागणी येईल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन! - राजेश टोपे 
थोडं पण कामाचं
  • ज्या दिवशी ८०० मे. टन ऑक्सिजनची मागणी येईल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन! - राजेश टोपे
  • संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मे. टन ही मर्यादा भविष्यात ५०० मे. टन वर आणू - राजेश टोपे
  • भारतात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले

Lockdown in Maharashtra only if daily oxygen (O2) demand touches 800 MT says Health Minister Rajesh Tope : मुंबई : ज्या दिवशी ८०० मे. टन ऑक्सिजनची मागणी येईल त्या दिवशी महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात येईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. 

भारतात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही मोठी आहे. यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन पुन्हा लावणार का, असा प्रश्न विचारला असता आरोग्यमंत्र्यांनी ऑक्सिजनच्या दैनंदिन मागणीने ८०० मे. टन हा टप्पा गाठताच लॉकडाऊन लावण्यात येईल असे सांगितले.

संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची ८०० मे. टन ही मर्यादा भविष्यात ५०० मे. टन वर आणावी लागेल, असेही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. सध्या राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहा या कालावधीत जमावबंदी लागू आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा; असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी