'रात्री 8 वाजता घोषणा करायला लॉकडाउन म्हणजे नोटबंदी नव्हे', राष्ट्रवादी काँग्रेसची टीका 

मुंबई
Updated Mar 25, 2020 | 08:55 IST

पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच मोदींच्या निर्णयावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली. 

modi and ncp
'रात्री 8 वाजता घोषणा करायला लॉकडाउन म्हणजे नोटबंदी नव्हे', राष्ट्रवादी काँग्रेसची टीका  

थोडं पण कामाचं

 •  कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पुढील 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.
 • पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
 • लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे- जयंत पाटील

मुंबईः  कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पुढील 21 दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच मोदींच्या निर्णयावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली. 

लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे, सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीपासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र जनतेला जास्त संभ्रमावस्थेत ठेवले असल्याने जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

जगभरातील कोरोना व्हायरस  प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, असं ट्विट करतच पाटील यांनी मोदींवर टीका केली. 

जीवनावश्यक गोष्टींच्या बाबत पंतप्रधानांच्या घोषणेमध्ये स्पष्टता अत्यंत आवश्यक होती. देश एका संकटाला तोंड देत असताना देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने अपुरी माहिती दिल्याने, देशात अनागोंदी निर्माण झाली आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

तसंच, महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही असेही स्पष्ट केले. महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात गेले दोन दिवस लॉकडाऊन सुरूच आहे. पुढील काळातही जनतेच्या सर्व जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. हे सरकार जनतेला जीवनावश्यक सुविधांच्या बाबतीत कोणताही त्रास होऊ नये यासाठी कटिबद्ध असल्याचंही आश्वासनही पाटील यांनी दिले.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील खास मोठ्या गोष्टी जाणून घ्या:

 1. भारताला वाचवण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकास घराबाहेर पडण्यावर आज रात्री १२ वाजेपासून बंदी घातली जात आहे.
 2. पुढील २१ दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, जर आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी किमान २१ दिवसांचा काळ खूप महत्वाचा आहे.

 3. देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता, परिसर आता बंद असणार आहे.
 4. पीएम मोदी म्हणाले की, लॉकडाऊन हा कर्फ्यूसारखाच  असेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. परंतु या लॉकडाऊनने घाबरून जाण्याची गरज नाही.
 5. या लॉकडाऊनची देशाला एक आर्थिक किंमत सहन करावी लागेल, परंतु या क्षणी प्रत्येक भारतीयांचे प्राण वाचवणे ही माझी, भारत सरकारची, देशातील प्रत्येक राज्य सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.
 6. आपल्या समोर हा एकमेव मार्ग आहे असे आपण देखील गृहित धरावं, आपल्याला घराबाहेर पडायचे नाही, काहीही झालं तरी आपण घरातच राहिले पाहिजे.
 7. पीएम मोदी म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही, आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी मिळतील
 8. रेशन, औषधे, रुग्णालये, फळे आणि भाजीपाला व दुधाची दुकाने खुली असतील, बँका, विमा व एटीएम खुले असतील आणि मांस, मासे उपलब्ध असतील व पशुखाद्य उपलब्ध होईल, पेट्रोल पंप तसेच एलपीजी गॅसही उपलब्ध असतील. मिळत राहील
 9. लॉकडाऊन दरम्यान काही गोष्टींमध्ये सूट मिळविण्यासाठी खोटे दावे केल्याचे आढळले तर दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. याशिवाय अंत्यसंस्कारा दरम्यान २० पेक्षा जास्त लोकांना जमा होण्याची परवानगी नाही.
 10. सरकारी निर्देशांचे पालन न केल्यास किंवा चुकीची माहिती पसरविल्यामुळे एका वर्षाची शिक्षा होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...