Lok Sabha Election 2024 Date: राज्यातील मविआ सरकार पडलं आणि भाजप-शिंदे सरकार राज्यात आलं. या शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्यासाठी मविआ एकही संधी सोडत नाहीये. विविध मुद्द्यांवरुन मविआ एकत्रितपणे शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत आहेत. त्यातच आता मविआमधील तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात मविआचा फॉर्म्युला ठरला असून जागावाटपही जवळपास निश्चित झालं असल्याचं वृत्त समोर येत आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टिप्स
महाविकास आघाडीतील तिन्ही नेत्यांची काही दिवसांपूर्वी एक बैठक पार पडली होती. पुढील लोकसभा निवडणूक ही तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचं या बैठकीत ठरलं होतं. त्यानंतर बुधवारी (15 मार्च 2023) रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 48 जागांपैकी 21 जागांवर उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 19 जागा लढवणार आहे तर काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात काँग्रेसचा एकच खासदार आहे त्यामुळे जास्तित जास्त जागा काँग्रेसला देता येतील का याबाबतही चर्चा सुरू आहे. तसेच पाच ते सहा अशा जागा आहेत ज्याबाबत अद्याप एकमत होत नसल्याचं बोललं जात असून त्याबाबतही चर्चा सुरू आहेत.
उद्धव ठाकरे गट - 21
राष्ट्रवादी काँग्रेस - 19
काँग्रेस 8
हे पण वाचा : टॉवेल न धुतल्याने होऊ शकते मोठे नुकसान
मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांपैकीं 4 जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.