दहावीचा निकाल: पाहा गेल्या वर्षी दहावीचा निकाल कधी लागला होता, यंदा कधी लागणार?

मुंबई
रोहित गोळे
Updated Jun 30, 2020 | 09:25 IST

SSC Result 2020: दहावीची बोर्डाची परीक्षा होऊन आता जवळजवळ तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही या परीक्षेचा निकाल लागू शकलेला नाही. जाणून घ्या यंदा हा निकाल कधी जाही केला जाणार आहे.

SSC Result
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • यंदा दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता
 • गेला वर्षी दहावीचा निकाल ८ जूनलाच झाला होता जाहीर
 • कोरोनामुळे यंदा शैक्षणिक पातळीवर बराच गोंधळ

मुंबई: कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्व व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. मात्र, याचा सर्वाधिक फटका शैक्षणिक पातळीवर बसण्याची शक्यता आहे. कारण जून महिना संपत आला तरी शैक्षणिक पातळीवर अद्यापही बराच गोंधळ असल्याचं दिसून येत आहे. दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत त्यामुळे पालकांसह आता विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या पुढील शिक्षणाविषयी चिंता वाटू लागली आहे. दहावीचा निकाल हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण येथूनच विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवं वळण मिळत असतं. त्यामुळे १०वीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता असते. मात्र, यंदा अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अद्यापही निकाल लागू शकलेला नाही. त्यामुळे आता निकाल नेमका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले आहेत. 

यंदा निकाल कधी लागणार? 

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे दहावीच्या परीक्षेतील शेवटचा पेपर देखील रद्द करावा लागला होता. त्यातच लॉकडाऊनमुळे दहावीचे पेपर तपासण्यास देखील बराच उशीर झाल्याने अद्यापही निकाल लागू शकलेला नाही. (SSC Exam)  दरम्यान, दहावीच्या निकालासाठी अद्यापही महिनाभर वाट पाहावी लागणार आहे. कारण बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या वर्षी जवजवळ दीड महिना उशिराने दहावीचा निकाल लागणार आहे.  (SSC Result 2020)

गेल्या वर्षी दहावीचा निकाल कधी लागला होता?

गेल्या वर्षी दहावीची परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टी वेळेत पार पडल्या होत्या. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ८ जून २०१९ रोजी जाही जाहीर करण्यात आला होता. मात्र, यंदा ही तारीख केव्हाच उलटून गेली आहे. मात्र, अद्यापही निकाल लागलेला नाही. 

कसा होता २०१९ मधील दहावीचा विभागीय निकाल 

 1. कोकण- ८८.३८ टक्के 
 2. कोल्हापूर- ८६.५८ टक्के
 3. पुणे- ८२.४८ टक्के 
 4. नाशिक- ७७.५८
 5. मुंबई- ७७.०४ टक्के
 6. औरंगाबाद - ७५.२०
 7. लातूर- ७२.८७
 8. अमरावती- ७१.९८
 9. नागपूर- ६७.२७

गेल्या वर्षी एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात ७ लाख ४८ हजार ७१५ विद्यार्थिनी आणि ८ लाख ७० हजार ८८७ विद्यार्थ्यांची संख्या होती. यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (look when was the result of ssc exam last year when will it be this year)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी