आनंदाची बातमी; म्हाडाच्या 3 हजार 15 घरांसाठी निघणार लॉटरी, मंत्री जिंतेद्र आव्हाडांची माहिती

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 10, 2022 | 19:28 IST

मुंबईत (Mumbai) राहण्याचं म्हटलं तर अपने बस की बात नही असाच एखादा हिंदी चित्रपटातील डॉयलॉग आपल्या तोंडात येत असतो. वाढणाऱ्या घरांच्या किंमती पाहता अनेकांना मुंबईत घर (Home) हे शक्य नसतं, दरम्यान अशा सर्वांसाठी म्हाडा लॉटरी (Lottery) पद्धतीने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घरं उपलब्ध करुन देत असते.

Minister Jitendra Awhad
म्हाडाच्या 3 हजार 15 घरांसाठी निघणार लॉटरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एकूण 3 हजार 15 घरांपैकी दुर्बल घटकांसाठी 1 हजार 947 घरे राखीव आहेत.
  • 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल.
  • सातारा, सोलापूर, सांगली, मिरज जिथे जिथे म्हाडाच्या जागा आहे तिथे इमारती बांधून लोकांच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल- आव्हाड

Mhada Lottery in Mumbai :मुंबई :  मुंबईत (Mumbai) राहण्याचं म्हटलं तर अपने बस की बात नही असाच एखादा हिंदी चित्रपटातील डॉयलॉग आपल्या तोंडात येत असतो. वाढणाऱ्या घरांच्या किंमती पाहता अनेकांना मुंबईत घर (Home) हे शक्य नसतं, दरम्यान अशा सर्वांसाठी म्हाडा लॉटरी (Lottery) पद्धतीने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घरं उपलब्ध करुन देत असते. ज्यामध्ये प्रत्येकजण अर्ज करु शकतो आणि ज्याचंही नाव सोडतीत निघेल त्याला कमी किंमतीत हक्काचं अधिकृत घर मुंबईत घेता येतं. दरम्यान ठरावीक काळानंतर विविध ठिकाणी ही घरं उपलब्ध होत असून आता म्हाडा नवीन 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल. मुंबईतील महत्त्वाचं ठिकाण असणाऱ्या गोरेगाव येथील पहाडी याठिकाणी संबधित घरं असून त्यांचं 70 टक्के पूर्ण झालं आहे. बांधकमा मंत्री जिंतेद्र आव्हाड (Minister Jintendra Awhad) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

'MMR क्षेत्रात म्हाडासारखे प्रकल्प होणार'

यासारखेच आणखी प्रकल्प MMR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्याचा म्हाडाचा विचार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं. पुण्यालाही 100 एकर जागा घेतली आहे. ठाण्यातही घरे बांधली जात असून सातारा, सोलापूर, सांगली, मिरज जिथे जिथे म्हाडाच्या जागा आहे तिथे इमारती बांधून लोकांच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल आणि म्हाडाच्या घरांचा दर खासगी बिल्डरांपेक्षा 60 टक्के कमी असेल असेही आव्हाड म्हणाले. दरम्यान म्हाडाविषयी माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. 

यावेळी मुंबईत एक हजार मुला-मुलींसाठी वसतीगृह बांधणार असून याठिकाणी ग्रंथालय, जिम, खेळण्यासाठी कोर्ट असेल अशी सुविधा असणार असल्याचं ते म्हणाले. पत्रा चाळ प्रकल्पही मार्गी लागत असून 26 जानेवारीला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाईल असं आव्हाड यांनी सांगितले. तसेच म्हाडाच्या 56 वसाहतींचा विकास करणार असून टागोर नगर, अभ्युदय नगर अशा अनेक ठिकाणी मोठ्या वसाहती असून त्यांचा विकास करणार असल्याचे आव्हाड म्हणाले.

कोणासाठी किती घरं?

एकूण 3 हजार 15 घरांपैकी दुर्बल घटकांसाठी 1 हजार 947 घरे राखीव आहेत. तर उर्वरीत घरांमधील अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न गटासाठी 227 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरे उपलब्ध आहेत. 25 लाख किंमतीच्या आतमध्ये वन रुम किचन इतक्या आकाराचे घर या प्रकल्पात घेता येणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी