BMC Election: मुंबईसह 14 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत, नगरसेवक होऊ पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस

मुंबई
भरत जाधव
Updated May 31, 2022 | 09:51 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवायच पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात महापालिका निवडणुकांचं (Municipal Corporation Election 2022) बिगुल वाजलं आहे. अशातच आज राज्यातील 14 महापालिकांची (Municipal Corporation) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.

Leaving reservations for 14 Municipal Corporations including Mumbai today
मुंबईसह 14 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नगरसेवक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस
  • मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
  • महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार

Municipal Corporation Election Reservation 2022 : मुंबई :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाशिवायच पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात महापालिका निवडणुकांचं (Municipal Corporation Election 2022) बिगुल वाजलं आहे. अशातच आज राज्यातील 14 महापालिकांची (Municipal Corporation) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वाँर्डासह आज मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. राज्यातील 14 महापालिकांपैरी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली, पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि कोल्हापूरच्या (Kolhapur) सोडतीकडे विशेष लक्ष असणार आहे. 

कुठल्या मनपांची आरक्षण सोडत ?

महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. तर आज मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. 

तसेच, राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाहीत, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी