मशिदींवरील भोंगे बंद झालेच पाहिजेत, राज ठाकरेंनी ट्वीट केला बाळासाहेबांचा व्हिडीओ

मुंबई
रोहन जुवेकर
Updated May 04, 2022 | 11:30 IST

Loudspeaker on mosques must be stopped, Raj Thackeray tweeted Balasaheb Thackeray video : मशिदींवरील भोंगे बंद होणार नसतील तर हनुमान चालिसा लावणार अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक नवे ट्वीट केले आहे. राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Raj Thackeray tweeted Balasaheb Thackeray video
राज ठाकरेंनी ट्वीट केला बाळासाहेबांचा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंनी ट्वीट केला बाळासाहेबांचा व्हिडीओ
  • मशिदींवरील भोंगे बंद झालेच पाहिजेत, राज ठाकरेंची आक्रमक भूमिका
  • व्हिडीओवरून चर्चेला उधाण

Loudspeaker on mosques must be stopped, Raj Thackeray tweeted Balasaheb Thackeray video : मुंबई : मशिदींवरील भोंगे बंद होणार नसतील तर हनुमान चालिसा लावणार अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक नवे ट्वीट केले आहे. राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत भोंग्यांविरोधात ठाम भूमिका मांडताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत. 

व्हिडीओत बाळासाहेब ठाकरे काय म्हणताना दिसत आहेत?

ज्या दिवशी या महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की, जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत; असे भाषण करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्हिडीओत दिसत आहेत.

व्हिडीओवरून चर्चा

राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक झाल्यापासून सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी राज ठाकरे आणि मनसे विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून सातत्याने होत आहे. या आरोपांना उत्तर म्हणून राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. व्हिडीओवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी