मुंबई : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ (LPG Gas Cylinder price hike) करण्यात आली आहे. या दरवाढीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात नुकतंच सत्तांतर झालं. राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेतील आमदारांनी बंड पुकारले आणि त्यानंतर हे सत्तांतर झाले. हे बंडखोर आमदार एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपला टोला लगावला आहे.
राज्यात भाजपप्रणीत शिंदे - फडणवीस सरकार येते आणि तात्काळ ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ होते यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा असं विधान महेश तपासे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एक मोठ्या अदृश्य शक्तीने बंडखोर आमदारांवर जो काही खर्च केला असेल तो खर्च गॅस दरवाढीतून वसूल केला जात आहे का? अशी शंका आता जनतेतून व्यक्त व्हायला लागली आहे असेही महेश तपासे यांनी म्हटले आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतील ५० आमदार फोडून दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच @BJP4India सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ₹५० रुपयांची दरवाढ केली आहे, यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा? @NCPspeaks@BJP4Maharashtra @abpmajhatv@zee24taasnews @TV9Marathi @News18lokmat pic.twitter.com/kfqTlXHaNP — Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) July 6, 2022
हे पण वाचा : शिंदे-पवारांची खरंच भेट झाली?जाणून घ्या VIRALफोटो मागचं सत्य
एकीकडे महाविकास आघाडीतील ५० आमदार फोडले आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच भाजप सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा? असा चेंडू राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जनतेच्या कोर्टात भिरकावला आहे.
हे पण वाचा : "देवेंद्र रात्री वेश बदलून शिंदेंना भेटायला जायचे" Shinde आणि Fadnavis भेटीबाबत अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट
महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या ५० आमदारांचे बंड आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर लगेचच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. दोन्हीकडे ५० बंडखोर आमदार आणि ५० रुपयांची गॅस सिलेंडर दरवाढ हे आकडे काहीतरी संकेत देत आहेत असेही महेश तपासे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आलंय आम्ही पेट्रोल - डिझेलवरील कर कमी करु असा दिलासा देण्याचे वक्तव्य केलेले असतानाच दुसरीकडे भाजपने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ केल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत असल्याचे महेश तपासे म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.