Mumbai AC Local : एसी लोकलमधील लगेज रॅक कोसळला; सुदैवाने कोणीही जखमी नाही, पश्चिम रेल्वेने घेतली दखल

AC Local : काही दिवसांपूर्वी ठाण्यात एसी लोकलचे दरवाजे उघडले नव्हते. आता एसी लोकलामधील लगेज रॅक कोसळला आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. पश्चिम रेल्वेने या घटनेची दखल घेत हा लगेज रॅक दुरुस्त केला आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर एसी लोकलच्या लगेज रॅक तपासणीचे आदेश दिले आहेत.

ac local luggage rack
एसी लोकल लगेज रॅक  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपूर्वी ठाण्यात एसी लोकलचे दरवाजे उघडले नव्हते.
  • आता एसी लोकलामधील लगेज रॅक कोसळला आहे.
  • सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. पश्चोम रेल्वेने या घटनेची दखल घेत हा लगेज रॅक दुरुस्त केला आहे.

AC Local : मुंबई : काही दिवसांपूर्वी ठाण्यात एसी लोकलचे दरवाजे उघडले नव्हते. आता एसी लोकलामधील लगेज रॅक कोसळला आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. पश्चिम रेल्वेने या घटनेची दखल घेत हा लगेज रॅक दुरुस्त केला आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर इतर एसी लोकलच्या लगेज रॅक तपासणीचे आदेश दिले आहेत. (luggage rack crashed in ac local in mumbai on western railway no injured)

अधिक वाचा : Mumbai News: मुंबईत महिलांच्या डब्ब्यात घुसून एका व्यक्तीकडून महिलेचा विनयभंग, अंधेरीतली घटना

बुधवारी 21 सप्टेंबर रोजी 7 वाजून 49 मिनिटांनी एक एसी लोकल विरारसाठी निघाली होती. तेव्हा एका कोचमध्ये एक लगेज रॅक खाली कोसळला. प्रवासी संतोष मिश्रा यांनी या रॅकचा फोटो ट्विट करून पश्चिम रेल्वेकडे तक्रार केली. पश्चिम रेल्वेने या तक्रारीची दखल घेत हा रॅक परत लावला. रॅक खाली नट बोल्ट निघाल्याने हा रॅक खाली कोसळल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व एसी लोकची तपासणी केली जाणार आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. 

अधिक वाचा : KALYAN : मन हेलावणारी घटना ! अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू

अधिक वाचा : World's Best School च्या यादीमध्ये भारतातील एकमेव शाळा, पुण्यातल्या या शाळेची खासियत आश्चर्यचकित करेल

दरवाजे उघडलेच नाहीत

17 सप्टेंबर रोजी रात्री सीएसएमटीहून ठाण्यासाठी निघालेली गाडी ठाण्याला पोहोचली. परंतु ही गाडी जेव्हा ठाणे स्थानकावर पोहोचली तेव्हा या गाडीचे दरवाजेच उघडले नाहीत. ट्रेन गार्डच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचे समोर आले. ही गाडी नंतर तशीच कळवा कारशेडला पोहोचली. कळवा कारशेडला पोहोचल्यानंतर प्रवाशांना तिथून घरी जावे लागले. गार्डच्या या चुकीमुळे प्रवाशांना त्रास झाला. 

अधिक वाचा : Ulhasnagar : भय इथले संपत नाही..., स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू ; ओटी चौकातील मानस टाॅवर इमारतीतील घटना


वादात एसी लोकल

ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकल सोडल्या जातात असा आरोप प्रवाशांनी केला होता. त्यामुळे कळवा कारशेडमध्ये प्रवाशांनी एसी लोकल पाऊण तास रोखल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एसी लोकलवर आक्षेप घेतला होता. ऐन गर्दीच्या वेळी एसी लोक सोडू नये अशी मागणी आव्हाड यांनी प्रवाशांच्या वतीने मध्ये रेल्वेकडे केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी