Maha TAIT Exam 2023 updates: TAIT परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा परिषदेने घेतला मोठा निर्णय

मुंबई
सुनिल देसले
Updated Feb 09, 2023 | 11:41 IST

Maha TAIT Exam in Marathi: शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
  • TAIT 2022 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
  • TAIT परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी परीक्षा परिषदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Maha TAIT Exam updates in Marathi: शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2022 परीक्षेचे 22 फेब्रुवारी 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra State Council of Examination Pune) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (maha tait exam 2023 Maharashtra state council of examination gives big decision read details in marathi)

CTET उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

जे उमेदवार केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) प्रविष्ठ झाले आहेत पण अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीये अशा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल TAIT- 2022 परीक्षेचा अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजेच 8 फेब्रुवारी 2023 नंतर लागणार असल्याची बाब विचारात घेऊन TAIT - 2022 परीक्षेस प्रविष्ठ होण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून TAIT 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

हे पण वाचा : सात दिवसात व्हा आयर्न मॅन, फक्त करावं लागेल हे डाएट

कागदपत्रे प्राप्त करण्यास...

या उमेदवारांच्या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा CTAT परीक्षेचा जो निकाल येईल तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) साठी करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे (नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट) इत्यादी मिळण्यास काही कालावधी लागणार आहे. हे लक्षात घेऊन अशा प्रकारची कागदपत्रे प्राप्त करण्यास 31 मार्च 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

हे पण वाचा : हे संकेत दिसल्यास समजून जा तुमची किडनी खराब झालीय

ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) 2022 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी 2023 होती मात्र, आता या तारखेत वाढ करुन 12 फेब्रुवारी 2023 अशी करण्यात आली आहे.

हे पण वाचा : बिनधास्त खा पिस्ता, आरोग्याची मिटेल चिंता

महत्त्वाच्या तारखा

तपशील

पूर्वीचा कालावधी

सुधारीत कालावधी

ऑनलाईन अर्ज सादर करायचा कालावधी  दिनांक 31 जानेवारी 2023 ते दिनांक 8 फेब्रुवारी 2023 दिनांक 31 जानेवारी 2023 ते दिनांक 12 फेब्रुवारी 2023
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीख

दिनांक 31 जानेवारी 2023 ते दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत

दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत

प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याचा कालावधी 

दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पासून  संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध केली जाईल

या संदर्भातील अधिकृत नोटिफिकेशनसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट mscepune.in ला भेट द्या किंवा TAIT या लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी