Ekanth khadse Vs Mahajan : महाजन म्हणतात नाथा भाऊंना ट्रिटमेंट हवी, तर खडसे म्हणातात गिरीश भाऊंना बुधवार पेठेत पाठवा

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 10, 2022 | 17:11 IST

जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या राजकरणात भाजपचे आमदार (BJP MLA) गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या वाद हा सर्वांना परिचीत आहे. दोन्ही नेते सध्या एकमेंकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.

Ekanth khadse Vs Mahajan
खडसे म्हणातात गिरीश भाऊंना बुधवार पेठेत पाठवा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
  • गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल - एकनाथ खडसे
  • मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप केल्याची चौकशी सुरू

Girish Mahajan Maratha Vidya Prasarak Sanstha Dispute :   जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या राजकरणात भाजपचे आमदार (BJP MLA) गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या वाद हा सर्वांना परिचीत आहे. दोन्ही नेते सध्या एकमेंकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.  त्यामुळे त्यांच्यात पहिल्यांदाच वाद होत आहेत. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. तर दुसरीकडे मराठा विद्या प्रसारक संस्था (Maratha Vidya Prasarak Sanstha) वादाच्या प्रकरणावरुन पोलिसांकडून महाजनांची चौकशी सुरू आहे. यावरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पोलिसांकडून महाजन यांचा तपाास सुरू असून त्यांच्यावर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या भीतीपोटी कोरोना झाला का? असा प्रवास उपस्थित केला जात आहे. एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, खडसेंना ट्रिटमेंटची गरज आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजन यांना उत्तर दिले आहे. गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल अशा शब्दात खडसेंनी टोला लगावला.  नाथा भाऊ म्हणाले की, नाथाभाऊंना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. पण गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवले पाहिजे. जळगावला जे मोक्कामध्ये आरोपी आहेत त्यांच्या घरावर आता पोलिसांची छापेमारी कारवाई सुरू आहे. संबंधित प्रकरणाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी छापे पडले असावेत, असे खडसे म्हणाले. 

महाजनांमागे चौकशी कशाची लागलीय

जळगावमधील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करुन गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड.विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. 

पुणे पोलिसांची पाच पथके जळगावात 

कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळी जळगावमध्ये दाखल झाले. पोलीस उपआयुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्त्वात पाच पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडून स्वतंत्ररित्या चौकशी केली जाणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी