Maharashtra Weather : मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी बरसणार, या १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

heavy rain
मुसळधार पाऊस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • रायगड जिल्ह्यात आज, उद्या आणि परवा असे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather : मुंबई : मुंबईत आज पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (maharahstra 14 district orange alert weather news heavy rain predict by metrological department)

अधिक वाचा : बाळासाहेबांचे विचार जे जपतात ती खरी शिवसेना : केसरकर

या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

रायगड जिल्ह्यात आज, उद्या आणि परवा असे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रत्नागिरीत उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि सातार जिल्ह्यात आजपासून तीन दिवस घाटात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  तर कोल्हापुरात रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाड्यात वादळी वार्‍यासह पाऊस

परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात उद्या रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावासाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. असेच परभणी जिल्ह्यात ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे.  

अधिक वाचा : Gram Panchayat Election: राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; १८ सप्टेंबरला मतदान, पाहा संपूर्ण वेळापत्रक

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अधिक वाचा : शिंदे गटाचं ठरलं! मुंबईत करुन दाखवणार अन् दादरमध्ये प्रति सेना भवन उभारुन दाखवणार 

राज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात

राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-१, घाटकोपर-१) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-१, सातारा-१,सांगली -२ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत. नांदेड- १, गडचिरोली- १, अशा एकूण  दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)  तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

अधिक वाचा : "मग शिवसेना माझीय असं म्हणायचं का?" उदयनराजे भोसले असं का म्हणाले? 

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  २८ जिल्हे व ३१६ गावे प्रभावित झाली आहेत. १०६ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून १९ हजार १३५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २४० प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी