विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखला जबरदस्त प्लान, 'या' नेत्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी

मुंबई
Updated Aug 22, 2019 | 22:16 IST

Maharashtra Assembly Election 2019: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपली जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून एका खास कमिटीची स्थापना केली आहे.

congress constitutes screening committee for upcoming assembly election
काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी तयार केली स्क्रिनिंग कमिटी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा प्लान
  • निवडणुकीसाठी बनवली एक खास कमिटी
  • कमिटीमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी
  • भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा आता कुठल्याही क्षणी होईल अशी परिस्थिती आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपली रणनिती आखली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्क्रिनिंग कमिटीची स्थापना केली आहे. खास बाब म्हणजे या स्क्रिनिंग कमिटीचं अध्यक्षपद हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दिलं आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तयार केलेल्या या स्क्रिनिंग कमिटीचं अध्यक्षपद माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दिलं आहे. तर मणिकम टागोर, हरिश चौधरी आणि पक्षातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचाही या कमिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

कमिटीमध्ये कुणाकडे कुठलं पद?

  1. ज्योतिरादित्य शिंदे - अध्यक्ष
  2. हरिश चौधरी - सदस्य 
  3. मणिकम टागोर - सदस्य 
  4. मल्लिकार्जुन खर्गे - अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी 
  5. बाळासाहेब थोरात - प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
  6. के. सी. पडवी - CLP Leader 

कोण आहेत ज्योतिरादित्य शिंदे? 

ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथील शिंदे घराणातील एक सदस्य आहेत. मध्यप्रदेशातील गुणा-शिवपुरी हा मतदारसंघ शिंदे कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. याच लोकसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांची आजी विजयाराजे शिंदे आणि वडील माधवराव शिंदे यांनी याच मतदारसंघातून अनेकदा निवडणूक जिंकत इतिहास रचला होता. विजयाराजे शिंदे यांनी सहावेळा निवडणूक जिंकली होती, माधवराव शिंदे यांनी चारवेळा तर ज्योतिरादित्य शिंदे हे सुद्धा चारवेळा या मतदारसंघातून निवडणून आलेले आहेत.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा ज्योतिरादित्य शिंदे हे विजयी झाले होते. ज्योतिरादित्य शिंदे हे एक उच्चशिक्षित सुद्धा आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतलं आहे. अर्थशास्त्रात पदवी शिक्षण घेतल्यावर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखला जबरदस्त प्लान, 'या' नेत्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी Description: Maharashtra Assembly Election 2019: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपली जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून एका खास कमिटीची स्थापना केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
विधानसभा उपसभापती विजय औटी यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, 'ती' क्लिप जनतेसमोर ठेवणार: निलेश लंके
विधानसभा उपसभापती विजय औटी यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, 'ती' क्लिप जनतेसमोर ठेवणार: निलेश लंके
महाराष्ट्रातील या विधानसभेच्या जागांवर पडले आरक्षण... पाहा तुमचा मतदार संघ आरक्षित तर नाही ना? 
महाराष्ट्रातील या विधानसभेच्या जागांवर पडले आरक्षण... पाहा तुमचा मतदार संघ आरक्षित तर नाही ना? 
धक्कादायक, पुण्यात फालुद्यात सापडले ब्लेड
धक्कादायक, पुण्यात फालुद्यात सापडले ब्लेड
मराठी माणसाला मारणं गुजराती माणसाला पडलं महागात, मनसेनं दिला दणका
मराठी माणसाला मारणं गुजराती माणसाला पडलं महागात, मनसेनं दिला दणका
लोकलच्या गार्डचा मोबाईल चोरला, लोकल सेवा विस्कळीत 
लोकलच्या गार्डचा मोबाईल चोरला, लोकल सेवा विस्कळीत 
पवार अमित शहांवर भडकले, दिले असे सडेतोड उत्तर
पवार अमित शहांवर भडकले, दिले असे सडेतोड उत्तर
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवल्याच्या शिवसृष्टीला प्रशासकीय मान्यता
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवल्याच्या शिवसृष्टीला प्रशासकीय मान्यता
[VIDEO] सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी, भीषण अपघात वाचला... 
[VIDEO] सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी, भीषण अपघात वाचला...