Maharashtra 13 ministers corona positive : राज्यात १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण, मुंबईत लॉकडाऊन लावण्याचा महापौरांचा इशारा

Maharashtra 13 ministers corona positive :  राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • राज्यातील १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण
  • तर लॉकडाऊन लावावा लागेल
  • मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra 13 ministers corona positive : मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील १३ मंत्री आणि ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

तर लॉकडाऊन लावावा लागेल

राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले असून मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जर दिवसाला २० हजार रुग्ण आढळले तर मुंबईत लॉकडाऊन लावाला लागेल अशी माहिती महापौर किशोरी पेडेणेकर यांनी दिली आहे. 


मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनी ट्विटवरवरून ही माहिती दिली असून दोघांवर उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की आपल्याला कोरोनाची लागण झाली असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे. सर्वांच्या आशिर्वादाने मी कोरोनातून बरा होईण आणि लवकरच आपल्या सेवेत दाखल होईन. तसेच जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. 


अरविंद सावंत यांनीही ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. तसेच आपण घरातच क्वारंटईन असून आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. 


मंगळवारी आढळले १८ हजारहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे १८ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६७ लाख ३० हजार ४९४ झाली आहे. मंगळवारी २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा १ लाख ४१ हजार ५७३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या प्रमाणात ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात ओमिक्रॉनचे ७५ रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ६५३ वर पोहोचली आहे. मुंबईत ओमिक्रॉनचे ४० रुग्ण आढळाले असून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी