महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा, कोरोनाबाधितांचा आकडा 1380 वर

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 10, 2020 | 15:18 IST

 महाराष्ट्रात 16 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचला आहे.  एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Maharashtra 16 new COVID19 positive cases
महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा, कोरोनाबाधितांचा आकडा 1380 वर  

थोडं पण कामाचं

  • राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
  • महाराष्ट्रात 16 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत.
  • राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचला आहे.

मुंबईः राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  महाराष्ट्रात 16 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचला आहे.  एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.  महाराष्ट्रात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जातं आहे. तरीही रुग्ण वाढत आहेत ही बाब निश्चितच चिंतेची आहे.

महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 

गुरूवारी राज्यात  कोरोनाच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं. तर राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.  तर महाराष्ट्रात काल कोरोनाचे 25 बळी गेले. त्यामुळे राज्यात कोरोनाबळींची संख्या 97 वर पोहोचली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.  मुंबईत काल 143 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

दादरमध्ये 'कोरोना'चे तीन नवे रुग्ण

दादरमध्येही कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.  यात एका हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे. तर 80 वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दादरमधलाही धोका वाढलेला दिसतोय. यात सुश्रृषा हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे. आज एका 27 वर्षीय आणि दुसऱ्या 42 वर्षीय नर्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर न.चि. केळकर मार्गावरील एका 80 वर्षीय वृद्धालाही कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या 6वर पोहोचली आहे. दादरमध्ये आतापर्यंत दिनकर अपार्टमेंट, सौभाग्य अपार्टमेंट, तावडेवाडी आणि केळकर रोडवर प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून सुश्रृषा हॉस्पिटलमधील दोन रुग्णांचा यात समावेश असल्याने हे हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी