मुंबईचं 'हे' हॉस्पिटल बनलं कोरोना सेंटर, हॉस्पिटलचे 25 स्टाफ कोरोनाबाधित

मुंबई
पूजा विचारे
Updated Apr 13, 2020 | 19:48 IST

Bhatia Hospital Mumbai: मुंबईचं प्रायव्हेट भाटिया हॉस्पिटलचे 25 स्टाफ कोरोना व्हायरसमुळे पॉझिटिव्ह आढळले आहेत. हॉस्पिटल पूर्णपणे सील केलं आहे.

COVID19
मुंबईचं 'हे' हॉस्पिटल बनलं कोरोना सेंटर, हॉस्पिटलचे 25 स्टाफ कोरोनाबाधित 

थोडं पण कामाचं

  • भाटिया हॉस्पिटल कोरोनाचं केंद्र बनल्याचं समोर आलं आहे.
  • येथे हॉस्पिटल 11 आणखी स्टाफ कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे.
  • हॉस्पिटलचे एकूण 25 स्टाफ कोविड 19 चे पॉझिटिव्ह मिळालेत.

मुंबईः  भाटिया हॉस्पिटल कोरोनाचं केंद्र बनल्याचं समोर आलं आहे. येथे हॉस्पिटल 11 आणखी स्टाफ कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच हॉस्पिटलचे एकूण 25 स्टाफ कोविड 19 चे पॉझिटिव्ह मिळालेत. रविवारी हॉस्पिटलचे 150 स्टाफची चाचणी केली गेली. हॉस्पिटलचे प्रवक्त्यानं म्हटलं की, 150 चाचण्यांपैकी 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. तर 139 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत. 

हॉस्पिटलकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात म्हटलं आहे की, सर्व 25 स्टाफनं आयसीयूत ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर 24 तास निगराणीत ठेवली जात आहेत. त्यापैकी सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर नाही आहे. याव्यतिरिक्त 139 स्टाफ कोरोना निगेटिव्ह आलेत. त्यांना दोन गटात विभाजित केलं आहे. एक आहे हाय रिस्क आणि दुसरं लो रिस्क. लो रिस्क असलेल्यांना होम क्वारंटाईनचं सक्तीनं पालन करण्यास सांगितलं आहे. तर हाय रिस्क असलेल्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केलं आहे. भाटिया हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. सध्याच्या परिस्थितीत भाटिया हॉस्पिटल सील केलं असून तो एक प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले.

मुंबई सेंट्रलमधील वॉकहार्ट सील

 मुंबई सेंट्रलमधील वॉकहार्ट हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे.   वॉकहार्ट हॉस्पिटलमधील 26 नर्स आणि 3 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेतर्फे वॉकहॉर्ट हॉस्पिटल आणि आजूबाजूचा परिसर हा कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्सच्या वैयक्तिक सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेण्यात न आल्यानं हॉस्पिलमधील दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा आरोप नर्सच्या नातेवाईकांनी केला होता. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 26 नर्स आणि 3 डॉक्टरांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णालयातून आतून बाहेर जाण्यास तसेच बाहेरुन रुग्णालयात जाण्यास मनाई करण्यात येत आहे. जोपर्यंत या हॉस्पिटलमधील सर्व रुग्णांचा रिपोर्ट हा जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत हा परिसर कंटेन्टमेंट झोन  म्हणून घोषित केला आहे. ड्युटीवर असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाइन करून हॉस्पिटल बंद केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी