महाराष्ट्र: शाळांचे सर्व वर्ग लवकरच सुरू होणार

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 17, 2021 | 22:38 IST

Maharashtra: All school classes will start soon महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या सर्व वर्गांची शाळा लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भातला निर्णय पुढील दहा ते पंधरा दिवसांत होण्याची शक्यता आहे. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हा निर्णय होईल.

Maharashtra: All school classes will start soon
महाराष्ट्र: शाळांचे सर्व वर्ग लवकरच सुरू होणार 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र: शाळांचे सर्व वर्ग लवकरच सुरू होणार
  • कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्णय होईल
  • डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या ६० टक्के अँटिबॉडिज

Maharashtra: All school classes will start soon । मुंबईः महाराष्ट्रात पहिलीपासूनच्या सर्व वर्गांची शाळा लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भातला निर्णय पुढील दहा ते पंधरा दिवसांत होण्याची शक्यता आहे. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर हा निर्णय होईल. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळांचे सर्व वर्ग सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांच्या शरीरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या ६० टक्के अँटिबॉडिज आहेत. यामुळेच डॉक्टरांनी शाळांचे सर्व वर्ग सुरू करण्याची शिफारस केली आहे. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून राज्यातील बहुसंख्य शाळा बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. पण यामुळे शाळेत शिकण्याच्या आनंदाला मुलं मूकत आहेत. यामुळेच शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. 

महाराष्ट्रात शाळेत मिळेल जात प्रमाणपत्र

महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना शाळेतच त्यांचे जात प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी शासकीय लाभांपासून वंचित राहणार नाही, असे राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने सांगितले. निवासीशाळा आणि आश्रमशाळेतील पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही या व्यवस्थेचा लाभ होईल. महाराष्ट्राचा सामाजिक न्याय विभाग शाळा व्यवस्थापनाच्या सहकार्याने ६ डिसेंबर २०२१ पर्यंत राज्यातील किमान एक लाख विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी