आघाडीचं ठरलं तर मग...काँग्रेस- राष्ट्रवादी 125-125 जागांवर लढणार

मुंबई
Pooja Vichare
Updated Sep 16, 2019 | 20:17 IST

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

Ncp chief Sharad Pawar
आघाडीचं ठरलं तर मग...काँग्रेस- राष्ट्रवादी 125-125 जागांवर लढणार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल.
  • काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे.
  • राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप एकत्र निवडणूक लढवणार आहेत.
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष 125- 125 जागा लढवणार आहेत.
  • त मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल. त्याआधी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष 125- 125 जागा लढवणार आहेत. तर त्यात मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान त्यांनी आघाडीच्या जागा वाटपाची घोषणा केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या विधानसभेत 288 जागा आहेत. त्यापैकी 125- 125 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

 

यावेळी शरद पवार म्हणाले की, यंदा नव्या चेहऱ्यांनी संधी दिली जाणार असून काही जागांमध्ये अदलाबदल करण्यात येईल. तसंच काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी आणि इतर डावे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचंही पवारांनी सांगितलं.  जागावाटपानंतर पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि मुंबईत जाहीर सभा घेणार असल्याचंही देखील पवारांनी यावेळी सांगितलं आहे. 

दुसरीकडे युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला दिसत नाही आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले होते की, येत्या दिवसात युतीची घोषणा होईल. अंतिम चर्चेसाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार होती. दरम्यान अजूनही यावर काही शिक्कामोर्तब झालेला दिसत नाही आहे. 

उदयनराजेंवर पवारांची टीका 

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या उदयनराजेंवर टीका केली आहे.  रविवारी साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले देखील उपस्थित होते. दरम्यान यात्रेनंतर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यालाच आज पवारांनी उत्तर दिलं आहे. उदयनराजे यांनी अन्याय झाल्याची जाणीव व्हायला १५ वर्षे का लागली? आपल्यावर अन्याय होतो हे त्यांना आधी कळलं नाही का?असं पवारांनी खोचकपणे विचारलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी