Maharashtra Assembly: देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी दीपक केसरकरांना डुलकी?; VIDEO होतोय तुफान VIRAL

Maharashtra assembly session: महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. 

Maharashtra assebly sesseion mla deepak kesarkar napping while dycm devendra Fadnavis speech video goes viral watch it
Maharashtra Assembly: देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी दीपक केसरकरांना डुलकी?; VIDEO होतोय तुफान VIRAL 
थोडं पण कामाचं
 • विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते
 • एकनाथराव शिंदे हे एक वेगळे रसायन आहे. 24*7 काम करणारा हा नेता आहे. माणुसकी असलेला हा नेता आहे - देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Maharashtra Assembly Session) घेण्यात आले. आज एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या सरकारने मांडलेला बहुमताचा प्रस्ताव मंजूर झाला. शिंदे-फडणवीस सरकारने (Eknath Shinde - Devendra Fadnavis government) 164 मते मिळवत बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला आणि सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत असताना त्यांच्या मागे बसलेल्या आमदार दीपक केसरकर (MLA Deepak Kesarkar) यांना झोप आवरत नसल्याचं दिसून आलं.

सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागच्या बाकावर आमदार दीपक केसरकर बसलेले आहेत. सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत असताना त्यांच्या पाठीमागे बसलेले दीपक केसरकर यांना जांभई येते आणि त्यानंतर त्यांना डुलकी लागल्याचंही दिसून येत आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओत सुद्धा केसरकर यांना झोप आवरत नसल्याचं दिसून येत आहे.

आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. एकनाथ शिंदे गट गुवाहाटी येथे असताना आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटाकडून अधिकृतपणे माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. आमदार दीपक केसरकर हे शिंदे गटाची बाजू माध्यमांसमोर अगदी व्यवस्थितपणे मांडताना दिसून आले. मात्र, याच केसरकरांचा आता सभागृहातील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा : मोठा धक्का, आणखी एका आमदारानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 1. आमच्या काळात सुरू झालेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पात एकनाथराव शिंदे यांनी अतिशय मोठे योगदान दिले. आरोग्य खात्यात सुद्धा त्यांनी अतिशय चांगले काम केले.
 2. एकनाथराव शिंदे हे एक वेगळे रसायन आहे. 24*7 काम करणारा हा नेता आहे. माणुसकी असलेला हा नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही आनंद दिघे साहेब यांची शिकवण, तोच कित्ता एकनाथराव शिंदे हे आज पुढे नेत आहेत.
 3. नंदुरबारहून मोर्चा निघाला तर त्यावेळी आमच्या इतर नेत्यांसोबत एकनाथराव शिंदे मोर्चेकऱ्यांच्या व्यवस्थेत धावले. मोर्चा विरोधात असला तरी त्यांची काळजी घेतली पाहिजे, हेच आमचे धोरण होते. कुणी विरोधात आहे, म्हणून छळ करायचा हे आमचे धोरण कधीच नव्हते.
 4. अतिशय कष्टाने एकनाथराव शिंदे यांनी आपले आयुष्य उभे केले. स्वतच्या जीवनात अनेक कटू प्रसंग आले, पण न थकता त्यांनी आयुष्य उभे केले. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हा निर्धार मोलाचा आहे.
 5. त्यांनी माझी टिंगलटवाळी केली, त्यांना मी माफ केले आहे. त्यांना माफ करणे हाच त्यांचा बदला आहे.
 6. सत्ता हे आमच्यासाठी केवळ साधन आहे. आमची खंत एकच होती, की जनतेने जनादेश देऊन सुद्धा एक विचित्र आघाडी जन्माला घातली गेली. त्यांचा अपमान केला गेला.
 7. मी कुणाला उपमा देत नाही, पण जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा कोणाला तरी चाणक्य बनून चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ती व्यवस्था ध्वस्त करावी लागते.
 8. मी नशीबवान आहे की माझे मुंबईत घर नाही. त्यामुळे माझे घर तुटले नाही आणि सरकारविरुद्ध आवाज उठवू शकलो.
 9. महाराष्ट्राचे राजकारण वेगळे आहे. कुणी किती मोठे विरोधक असले तरी आपण एकमेकांकडे जातो. हे राजकारण असेच असले पाहिजे.
 10. सत्तेचा अहंकार डोक्यात जाऊन उपयोग नसतो. मध्यंतरीच्या काळात अनेक दुर्दैवी घटना महाराष्ट्राने अनुभवल्या.
 11. नेत्यांच्या उपलब्धतेचा अनुशेष महाराष्ट्रात निर्माण झाला होता, ती कसर आता भरून निघेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी