एमडी बनवून विकणारे पाच ड्रग्समाफिया गजाआड, ५३ कोटींचे ड्रग्स जप्त 

मुंबई
Updated Sep 11, 2019 | 09:18 IST

मेफेड्रॉन (एमडी) हे घातक ड्रग्स तयार करून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात विकणाऱ्या पाच ड्रग्समाफियांना दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस)नं गजाआड केलं आहे. तब्बल 53 कोटी रूपयांचे मेफेड्रॉन नावाचे ड्रग्स जप्त केल आहे.

seized drugs
५३ कोटींचे ड्रग्स जप्त, नवी मुंबईत विक्रोळीत एटीएसची कारवाई   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • मेफेड्रॉन (एमडी) हे घातक ड्रग्स तयार करून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात विकणाऱ्या पाच ड्रग्समाफियांना दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस)नं गजाआड केलं आहे.
  • दहशतवादीविरोधी पथकाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली त्यानुसार एटीएसनं नवी मुंबई आणि विक्रोळी परिसरात छापेमारी केली आहे.
  • या छापेमारीत तब्बल 53 कोटी रूपयांचे मेफेड्रॉन नावाचे ड्रग्स जप्त करण्यात आलेत. 

मेफेड्रॉन (एमडी) हे घातक ड्रग्स तयार करून मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात विकणाऱ्या पाच ड्रग्समाफियांना दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस)नं गजाआड केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तक्रारी होत आहे आणि यात मोठ्या प्रमाणात कॉलेज तरूण तरूणी याला बळी पडत असल्याची माहिती समोर आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवादीविरोधी पथकाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली त्यानुसार एटीएसनं नवी मुंबई आणि विक्रोळी परिसरात छापेमारी केली आहे. या छापेमारीत तब्बल 53 कोटी रूपयांचे मेफेड्रॉन नावाचे ड्रग्स जप्त करण्यात आलेत. 

याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून एटीएसकडून अधिक तपास केला जात आहे. नवी मुंबई येथे एका फॅक्टरीत हे माफिडा एमडी बनवायचे. याच फॅक्टरीवर छापेमारी करत पोलिसांनी पनवेल येथील गोदामातून ५१ कोटी ६० लाख किंमतीचे १२९ किलो एमडीचा साठा आणि एमडी विकून जमा झालेली १ कोटी ४० लाखांची रक्कम जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ५२ कोटी ६४ लाख ९४ हजार इतकी आहे. 

दहशतवादीविरोधी पथकाच्या विक्रोळी कक्षातले संदीप विश्वासराव, अनिल ढोले यांना  यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात आणणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत एटीएसनं दोघांना ९ किलो मेफेड्रॉनसोबतच अटक केली. यात जितेंद्र परमार ऊर्फ आसिफ, नरेश मस्कर, अब्दुल रझाक, सुलेमान शेख आणि इरफार शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 

अटक करण्यात आलेले आरोपी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाचे रसायन वापरून नवी मुंबईतील फॅक्टरीत एमडी बनवायचे. त्यानंतर तो एमडी मुंबई आणि राज्यातल्या विविध तस्करांना विकायचे. मुंबईत तस्करांना एमडी पुरवणारे हे सर्वात मोठे नेटवर्क होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...