संजय राऊतांविरोधात जामीनपात्र वॉरंट

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 08, 2022 | 16:57 IST

MAHARASHTRA : BAILABLE ARREST WARRANT ISSUED AGAINST SANJAY RAUT BY SEWREE COURT IN A COMPLAINT FILED BY MEDHA KIRIT SOMAIYA : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.

BAILABLE ARREST WARRANT ISSUED AGAINST SANJAY RAUT
संजय राऊतांविरोधात जामीनपात्र वॉरंट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • संजय राऊतांविरोधात जामीनपात्र वॉरंट
  • किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर वॉरंट काढण्यात आले
  • मुंबईतील शिवडी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट काढले

MAHARASHTRA : BAILABLE ARREST WARRANT ISSUED AGAINST SANJAY RAUT BY SEWREE COURT IN A COMPLAINT FILED BY MEDHA KIRIT SOMAIYA : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर हे वॉरंट काढण्यात आले आहे. मुंबईतील शिवडी न्यायालयाने हे जामीनपात्र वॉरंट काढले आहे. संजय राऊत यांनी १८ जुलै २०२२ रोजी शिवडी न्यायालयात उपस्थित व्हावे असे या वॉरंटमध्ये नमूद आहे. 

शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मागच्या महिन्यात म्हणजेच जून २०२२ मध्ये संजय राऊत यांच्या विरोधात समन्स काढले होते. हे समन्स असूनही संजय राऊत ४ जुलै २०२२ रोजी शिवडी न्यायालयात अनुपस्थित होते. संजय राऊत यांच्यावतीने वकील पण न्यायालयात आला नव्हता. ही बाब शिवडी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट काढण्याची मागणी केली. शिवडी न्यायालयाने ही मागणी मान्य करत संजय राऊत यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढले आहे. पुढील सुनावणी १८ जुलै २०२२ रोजी होणार आहे. या सुनावणीला अनुपस्थित राहिल्यास संजय राऊत यांना अटक केले जाईल. यानंतर जामीन घेण्याच्या निमित्ताने का होईना पण संजय राऊत यांना न्यायालयात हजर राहावे लागेल. 

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या कंत्राटातून १०० कोटींचा घोटाळा झाला. किरीट सोमय्या यांनी हा घोटाळा केला; अशा स्वरुपाचा आरोप संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. संजय राऊत यांनी केलेला हा आरोप निराधार आणि बदनामीकारक आहे; असे मेधा किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. पतीवर आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी थेट न्यायालयात दाद मागितली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी विवेकानंद गुप्ता आणि लक्ष्मण कनाल या वकिलांच्या मार्फत संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयात दावा केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी