Maharashtra BJP: महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष अन् मुंबई अध्यक्ष ठरले; 'या' दोन नेत्यांना मिळाली संधी

मुंबई
सुनिल देसले
Updated Aug 12, 2022 | 15:46 IST

Maharashtra BJP news updates: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर नव्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Mumbai Maharashtra BJP President: राज्यात सत्तांतर झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांना स्थान देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता कुणाची वर्णी लागणार यावरुन अनेक दिवस चर्चा रंगत होती. दोन महत्त्वाच्या पदांवर एक व्यक्ती नको या नियमानुसार महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई भाजप अध्यक्ष या दोन्ही पदांवर आता नव्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra BJP appoints Chandrashekhar Bawankule as state president and ashish shelar as mumbai bjp chief)

भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजप प्रदेशाध्यक्षपदी संधी दिली आहे. तर आशिष शेलार यांना पुन्हा एकदा मुंबई भाजप अध्यक्षपद दिले आहे.

अधिक वाचा : Uddhav Thackeray: मुंबईतील माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र, वाचा काय म्हणाले

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता ही निवड फार महत्त्वाची ठरणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करत ओबीसी चेहरा भाजपने दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून संवेदनशील बनला आहे. त्याच परिस्थितीत भाजपने ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्षपदावर दिला आहे.

अधिक वाचा : Pankaja Munde: कॉलेजमध्ये तुम्हाला कधी कुणी प्रपोज केलंय का मॅडम?, पाहा पंकज मुंडेंनी काय दिलं उत्तर

तर मुंबईत आशिष शेलार यांना पुन्हा मुंबईचं अध्यक्षपद दिलं आहे. शिवसेनेला टक्कर देत २०१७ सालची मुंबई मनपा निवडणूक आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपने लढली होती आणि त्यात भाजपने घवघवीत यश मिळवलं होतं. त्यानंतर आता आशिष शेलार यांना पुन्हा संधी दिल्याने आगामी निवडणुकीत भाजपला याचा मोठा फायदा होईल असं दिसत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचा अल्प परिचय

  1. चंद्रशेखर बावनकुळे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत 
  2. यापूर्वी नागपुरातील कामठी मतदारसंघातून २००४ साली ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. २००४ ते २०१९ पर्यंत ते आमदार होते 
  3. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री होते 
  4. नागपुरचे माजी पालकमंत्री
  5. भाजपचा ओबीसी आणि विदर्भातील एक चेहरा 

आशिष शेलार यांचा अल्प परिचय

  1. राजकीय कारकीर्दीला मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून सुरुवात
  2. विधानपरिषदेचे सदस्य होते 
  3. २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळा ते वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले
  4. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं. 
  5. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काहीकाळ ते शिक्षणमंत्री होते 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी