HSC exam Hall Ticket: १२वीच्या विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून हॉल तिकीट मिळणार; पाहा कसे मिळेल Hall Ticket

Maharashtra Board Exam 2021: बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट येत्या ३ एप्रिल पासून उपलब्ध होणार आहे. जाणून घ्या सविस्तर वृत्त...

students
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
  • विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून मिळणार परीक्षेचं हॉल तिकीट

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune) यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या १२वीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट (HSC students hall ticket) विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. हे हॉल तिकीट ऑनलाईन माध्यमातून डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. यंदा १२वीची लेखी परीक्षा ही २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. 

शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एप्रिल-मे २०२१ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२वी) परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शनिवार (३ एप्रिल २०२१) पासून कॉलेज लॉगईन (College Login)मध्ये डाऊनलडोड करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असेही बोर्डाने म्हटलं आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट 

  1. एप्रिल-मे २०२१ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी इयत्ता १२वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावे.
  2. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा / प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. 
  3. प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्ता उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
  4. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ता उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे.
  5. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांला प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
  6. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करायची आहे.

यंदा परीक्षेसाठी वाढीव वेळ

यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार असून परीक्षा सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होईल. या वर्षी विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन परीक्षेची वेळ वाढवण्यात आली आहे. ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे तर ४०-५० गुणांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी १५ मिनिटे अधिक वेळ देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी