Maharashtra Budget for Farmers: शेतकऱ्यांसाठी खुशखबर; वर्षाला 12 हजार रुपये अन् एक रुपयात मिळणार पीक विमा

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 09, 2023 | 15:03 IST

Maharashtra Budget 2023: राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Maharashtra Budget 2023 government announce namo shetkari mahasanman nidhi yojana faremers will get crop insurance in just 1 rs
Maharashtra Budget for Farmers: 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर', 12 हजार रुपयांची मदत अन् एक रुपयात पीक विमा मिळणार 
थोडं पण कामाचं
  • 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर'
  • शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपयांची मदत मिळणार, शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार
  • शेतकऱ्यांच्या नुकसानाचे ई-पंचनामे होणार, उपग्रह आणि संगणकाची मदत घेऊन ई-पंचनामे होणार

Maharashtra Government big announcement for farmers: महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यात जनतेच्या सूचना व मतांचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर' करण्यात आली आहे.

  1. अमृत काळातील राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प पाच ध्येयांवर आधारित असून 'पंचामृत' असा आहे. 
    पहिले अमृत - शाश्वत शेती - समृद्ध शेतकरी
    दुसरे अमृत - महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 
    तिसरं अमृत - भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
    चौथे अमृत - रोजगार निर्मिती; सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
    पाचवे अमृत - पर्यावरणपूरक विकास
  2. 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर'
  3. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
  4. शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपयांची मदत मिळणार
  5. शेतकऱ्यांच्या वार्षिक मदतीत 6 हजार रुपयांची वाढ
  6. शेतकऱ्यांच्या विम्याचा हफ्ता सरकार भरणार
  7. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार
  8. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजार प्रोत्साहनपर अनुदान
  9. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1345 कोटी अनुदान
  10. येत्या 3 वर्षांत सेंद्रिय शेतीला चालना देणार
  11. बुलढाण्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र
  12. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे ई-पंचनामे होणार
  13. उपग्रह आणि संगणकाची मदत घेऊन ई-पंचनामे होणार
  14. 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देणार
  15. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
  16. 12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचाराची मर्यादा वार्षिक दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी