Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan, : मंत्री सभागृहात गैरहजर,अजित पवारांच्या संतापाचा पारा चढला; फडणवीसांची दिलगिरी

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 15, 2023 | 13:30 IST

maharashtra budget session: सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. लक्ष्यवेधीच्या वेळी मंत्र्यांची कृती अजित पवार यांना रुचली नसून त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि फडणवीससह अनेक मंत्र्यांना फैलावर घेतलं. 

maharashtra budget session:  ajit pawar slams shinde fadnavis cabinet ministers
मंत्री सभागृहात गैरहजर,अजित पवारांच्या संतापाचा पारा चढला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली
  • अजित पवार यांना मंत्र्यंचा समाचार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
  • भाजप आमदार कालिदास कोळमकर  यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

मुंबई : आज आठ लक्षवेधी होत्या. पण  सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे सात लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. लक्ष्यवेधीच्या वेळी मंत्र्यांची कृती अजित पवार यांना रुचली नसून त्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि फडणवीससह अनेक मंत्र्यांना फैलावर घेतलं. 

अधिक वाचा  : उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं

तुम्ही मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता. आम्हाला मंत्री करा, यासाठी मागे लागता. परंतु, मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाही, तुम्हाला नेमून दिलेलं वैधानिक काम करत नाही. अध्यक्षसाहेब हे अत्यंत गलिच्छपणाचे कामकाज चालले आहे. गैरहजर मंत्र्यांपैकी कोणालाही विधिमंडळाच्या कामकाजात रस नाही. यांना बाकीच्याच कामांमध्ये रस आहे. पण त्यांनी सभागृहातील कामाला महत्त्व देण्याची गरज आहे.

अधिक वाचा  : तुमच्या या चुका खराब करतील ​लिव्ह-इन-रिलेशनशिप​

आम्हाला बोलण्याची वेळ का येते? निर्ल्लजपणाचा कळस गाठला गेला की आमचाही नाईलाज होतो, अशा कठोर शब्दांत अजित पवार यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले. अजित पाटील यांच्या संतापाच्या लाटेत चंद्रकांत पाटीलदेखील होरपळले गेले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रात्री दोन-अडीचपर्यंत जागून काम करायची सवय आहे. पण चंद्रकांत पाटील तर रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी तरी सकाळी लवकर उठून सभागृहात आले पाहिजे होते. ज्यांची लक्षवेधी होती त्या मंत्र्यांनीही सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे होते.  

अधिक वाचा  :मेडिक्लेमच्या रक्कमेबाबत कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

 
संसदीय कामकाज मंत्री सभागृहात नसतात. देवेंद्रजी आम्ही तुमच्याकडे सिनिअर म्हणून बघतो. तुम्ही उच्चविद्याविभुषित आहात, पण तुमचंही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या मंत्र्यांना सांगा, असे अजित पवार यांनी म्हटले. आज आठ लक्षवेधी होत्या, पण सात लक्षवेधी मंत्री सभागृहात नसल्याने पुढे ढकलण्याची नामुष्की आली असल्याचं अजित पवार म्हणाले. 

फडणवीसांची दिलगिरी 

अजित पवार यांना मंत्र्यंचा समाचार घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेली बाब गंभीर आहे. काल रात्री एक वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज चालले. ऑर्डर ऑफ डे ही रात्री एक वाजता निघाली. त्यामुळे मंत्र्यांना ब्रिफींगला वेळ मिळत नाही. मात्र, सर्व मंत्र्यांना समज दिली जाईल. याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे फडणवीस म्हणाले. 

भाजप आमदार कालिदास कोळमकरांचीही नाराज

मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता, पण कामकाजाच्या वेळी अनुपस्थित का राहता? असा सवाल करत भाजप आमदार कालिदास कोळमकर  यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. विधानसभेत सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ आली आहे. सभागृहात आमदारांकडून मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी