ग्रामपंचायतींमधील ७ हजार १३० रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 18, 2021 | 22:11 IST

Maharashtra : By-election for 7130 vacant posts in Gram Panchayats महाराष्ट्रातील चार हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सात हजार १३० सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार

Maharashtra : By-election for 7130 vacant posts in Gram Panchayats
ग्रामपंचायतींमधील ७ हजार १३० रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक 
थोडं पण कामाचं
  • ग्रामपंचायतींमधील ७ हजार १३० रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक
  • पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान
  • २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी

Maharashtra : By-election for 7130 vacant posts in Gram Panchayats मुंबईः महाराष्ट्रातील चार हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सात हजार १३० सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ७ डिसेंबर २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी