Shinde Fadanvis Government : या दिवशी होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, या आमदाराने दिली माहिती

३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. असे असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून विरोधीपक्षानेही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. परंतु लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी महिती शिंदे गटातील एका बंडखोर आमदाराने दिली आहे

Eknath shinde
Devendra Fadanvis   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
  • असे असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
  • परंतु लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी महिती शिंदे गटातील एका बंडखोर आमदाराने दिली आहे

Shinde Fadanvis Government : मुंबई : ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. असे असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यावरून विरोधीपक्षानेही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. परंतु लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी महिती शिंदे गटातील एका बंडखोर आमदाराने दिली आहे. (maharashtra cabinet expansion before 15 august says mla uday samant)

अधिक वाचा : Supreme Court: 'इथे कोणी पक्षच सोडलेला नाही...', हरीश साळवेंचा जोरदार युक्तिवाद, सिब्बल म्हणाले...

१५ ऑगस्ट पूर्वी होणार मंत्रिमंडळ विस्तार

३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. एक महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत म्हणाले की १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल. असे असले तरी मुख्यमंत्री शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही.

अधिक वाचा : Uddhav Thackeray यांची चूक भोवणार? Eknath Shinde गटाला दिलासा मिळणार

पालकमंत्री करणार ध्वजवंदन

उदय सामंत म्हणाले की १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करतील. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाते ही एक अतिरिक्त जबाबदारी असून ती मंत्रिमडळातील सदस्यांकडे दिली जाते असेही सामंत म्हणाले.

अधिक वाचा : Uday Samant: उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, पुण्यातील कात्रज चौकात दगडफेक

राष्ट्रवादीची टीका

शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने यावर टीका केली आहे. शिंदे फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळत नसल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे सांगितले जात आहे परंतु तसे काहीच होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, २० हून अधिक वेळेला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी घोषणा करण्यात आली होती, परंतु अद्याप विस्तार झालेला नाही. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्यांन नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे असेही तपास म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी