राज्य मंत्रिमंडळ विस्तार - विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण तर आशिष शेलार शालेय शिक्षण मंत्री

मुंबई
Updated Jun 16, 2019 | 23:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले. मंत्रिमंडळात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत.

radhakrishna vikhe patil
राधाकृष्ण विखे पाटील 

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनात पार पडला. यावेळी मंत्रिमंडळात १३ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. यात ८ कॅबिनेट तर ५ राज्य मंत्र्यांचा समावेश करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले. मंत्रिमंडळात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. शिक्षण विभाग मंडळात विनोद तावडे यांच्याकडे उच्च शिक्षण खाते तर आशिष शेलार यांना शालेय शिक्षण मंत्री बनवण्यात आले आहे. तसे त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातेही सोपवण्यात आले आहे. 

प्रकाश मेहता यांच्याकडे असलेले गृहनिर्माण खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना सोपवण्यात आले आहे. श्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन खाते सोपवण्यात आले आहे. राम शिंदे यांच्याकडे पणन व वस्त्रोद्योग खाते सोपवण्यात आले आहे. सुभाष देशमुख यांना सहकार, मदत आणि पुनर्वसन हे खाते देण्यात आले आहे. अनिल बोंडे यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यात आले आहे. सुरेश खाडे हे सामाजिक न्याय मंत्री बनले आहेत. 

कॅबिनेट मंत्री

 1. राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण
 2. जयदत्त क्षीरसागर - रोजगार हमी आणि फलोत्पादन
 3. आशिष शेलार - शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण
 4. संजय कुटे - कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण
 5. सुरेश खाडे - सामाजिक न्याय
 6. अनिल बोंडे - कृषी
 7. अशोक उईके - आदिवासी विकास
 8. तानाजी सावंत - जलसंधारण
 9. राम शिंदे - पणन व वस्त्रोद्योग
 10. संभाजी पाटील निलंगेकर - अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
 11. जयकुमार रावल - अन्न आणि औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
 12. सुभाष देशमुख - सहकार, मदत आणि पुनर्वसन

राज्य मंत्री

 1. योगेशे सागर - नगरविकास
 2. अविनाश महातेकर - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
 3. संजय भेगडे - कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
 4. डॉ. परिणय फुके - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास
 5. अतुल सावे - उद्योग आणि खाणी कर्म, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज्य मंत्रिमंडळ विस्तार - विखे पाटील यांच्याकडे गृहनिर्माण तर आशिष शेलार शालेय शिक्षण मंत्री Description: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले. मंत्रिमंडळात अनेक फेरबदल करण्यात आले आहेत.
Loading...
Loading...
Loading...