अखेर ठरलं! काँग्रेसमधला खातेवाटपाचा वाद मिटला, मंत्र्यांना मिळणार 'या' 10 खात्यांचा कारभार

मुंबई
पूजा विचारे
Updated Jan 04, 2020 | 09:29 IST

महाविकास आघाडी सरकारचं गेल्या 5 दिवसांपासून रखडलेलं खातेवाटप आज जाहीर होणार आहे. या खातेवाटपाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दिला आहे. अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे.

Congress
अखेर ठरलं! काँग्रेसमधला खातेवाटपाचा वाद मिटला, मंत्र्यांना मिळणार 'या' 10 खात्यांचा कारभार 

महाविकास आघाडी सरकारचं गेल्या 5 दिवसांपासून रखडलेलं खातेवाटप आज जाहीर होणार आहे. कोणत्याही क्षणी आज  खातेवाटप जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 36 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला 5 दिवस उलटून गेले तरी मंत्र्यांना खाती मिळालेली नाही आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य सरकारच्या खातेवाटपावरून चर्चां सुरू असल्याचं बोललं जातं होतं. पण आता अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे.  आज सकाळी किंवा दुपारपर्यंत खातेवाटप होईल अशी माहिती समोर येत आहे. 

या खातेवाटपाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दिला आहे. यावेळी काँग्रेसला बंदरे, खार जमिनी आणि सांस्कृतिक अशी तीन खाती देण्यात आलीत. काँग्रेसला आता 4 वाढीव खात्यानंतर दिल्लीहून काँग्रेसची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे. काँग्रेसच्या नेत्यांची वजनदार खात्यांची मागणी पूर्ण झाली माहिती सुत्रांनी दिली आहे. 

खातेवाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची शुक्रवारी रात्री बैठक झाली. राष्ट्रवादीच्या या बैठकीत पक्षाच्या वाट्याला आलेल्या खात्यांच्या वाटणीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित यादी मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर त्यावर राज्यपाल यांची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर खातेवाटपाची घोषणा होईल. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी तयार आहे. रात्री उशिरा काँग्रेसच्या वाट्यातल्या 10 मंत्र्यांच्या खातेवाटपाला सोनिया गांधींनी मान्यता दिला आहे. 

  1. बाळासाहेब थोरात- महसूल
  2. अशोक चव्हाण-  सार्वजनिक बांधकाम
  3. नितीन राऊत- ऊर्जा 
  4. असल्म शेख- वस्त्रोद्योग, मत्सव्यवसाय आणि बंदरे
  5. वर्षा गायकवाड- शालेय शिक्षण
  6. के.सी. पडवी- आदिवासी विकास
  7. अमित देशमुख- उच्च शिक्षण
  8. सुनील केदार- वैद्यकीय शिक्षण
  9. विजय वडेट्टीवार- दुग्ध विकास व पशुसंवर्धन
  10. यशोमती ठाकूर- महिला व बालकल्याण

ही खाती काँग्रेसच्या वाट्याला आली आहेत.  राष्ट्रवादीला माजी सैनिक कल्याण, क्रीडा व युवक कल्याण अशी दोन अतिरिक्त खाती देण्यात आलीत. तर कृषी आणि परिवहन खातं हे शिवसेनेकडे राहणार आहे. काँग्रेसनं केलेली कृषी खात्याची मागणी शिवसेनेनं फेटाळली आहे. तसंच पाहायला गेल्यास काँग्रेसला मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात कमी खाती मिळाली आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खातं कायम असणार आहे. तर नितीन राऊत यांना ऊर्जा खातं तर अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी