सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना संकटावर होणार चर्चा, निर्बंध लागू होण्याची शक्यता

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jun 06, 2022 | 00:52 IST

maharashtra cabinet meeting on monday 6 june 2022 for discuss sop in state due to rise in corona cases : राज्य शासनाने सोमवार ६ जून २०२२ रोजी संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना संकटावर चर्चा होणार आहे.

maharashtra cabinet meeting on monday 6 june 2022 for discuss sop in state due to rise in corona cases
सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना संकटावर होणार चर्चा, निर्बंध लागू होण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोना संकटावर होणार चर्चा, निर्बंध लागू होण्याची शक्यता
  • सोमवार ६ जून २०२२ रोजी संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळाची बैठक
  • राज्यात निर्बंध लागू करायचे की नाही याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता

maharashtra cabinet meeting on monday 6 june 2022 for discuss sop in state due to rise in corona cases : मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे ६७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे. यामुळे राज्य शासनाने सोमवार ६ जून २०२२ रोजी संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना संकटावर चर्चा होणार आहे. बैठकीत कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी करायच्या उपायांवर चर्चा होईल आणि निर्णय घेतले जातील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना संकट नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने करायच्या उपायांवर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात निर्बंध लागू करायचे की नाही याचा निर्णय पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील शाळा परंपरागत ऑफलाइन पद्धतीने कार्यरत ठेवायच्या की पुन्हा काही आठवडे ऑनलाइन शिक्षण सुरू करायचे याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आरोग्य विभागाचा सल्ला घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचे निर्णय घेणार असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा १३ जूनपासून सुरू होणार आहेत. यामुळे शाळा व्यवस्थापनांचे लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे ६७६७ अॅक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात आज १४९४ रुग्ण आणि एक मृत्यू यांची नोंद झाली तर ६१४ जण बरे झाले. राज्यात ६७६७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ७८ लाख ९३ हजार १९७ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख ३८ हजार ५६४ बरे झाले. राज्यात कोरोनामुळे १ लाख ४७ हजार ८६६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात झालेल्या ८ कोटी १० लाख ६१ हजार २७० कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ९३ हजार १९७ पॉझिटिव्ह आल्या. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८७ टक्के,  पॉझिटिव्हिटी रेट ९.७४ टक्के, रिकव्हरी रेट ९८.०४ टक्के आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी