Maharashtra Chief Minister Eknath Shinde meet MNS Chief Raj Thackeray in Mumbai, Uddhav Thackeray speech in Malegaon Nashik criticise cm eknath shinde and bjp gave challenge to take elections : महाराष्ट्रात रविवारचा (26 मार्च 2023) दिवस राजकीय घडामोडींचा होता. आधी नांदेड जिल्ह्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सभा झाली. नंतर मालेगाव येथे उद्धव ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र मेळावा पार पडला. ही सभा संपण्याच्या सुमारास मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे झाली.
उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत भाजपवर सडकून टीका केली. महाविकास आघाडी एकत्र आहे आणि भाजप विरोधात एकत्रच लढणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. 'मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागणार. हिंमत असेल तर राज्यात निवडणूक घ्या', असेही उद्धव ठाकरे म्हणाले. याआधी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाने जनहिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. जनतेच्या हिताचे निर्णय घ्या अशा स्वरुपाची मागणी त्यांनी सभेतून महाराष्ट्र सरकारकडे केली. या घडामोडी सुरू असतानाच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली.
राज यांनी मुंबईत गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना माहिम येथील समुद्रातील बांधकाम आणि सांगलीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम याकडे लक्ष वेधले होते. महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी 24 तासांच्या आत कारवाई करून अनधिकृत बांधकाम पाडले होते. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरे यांचं कौतुक केले होते. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी राज यांची भेट घेतली. या भेटीमुळे नव्या गणितांची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल
वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स
ही भाजी खा आणि स्मरणशक्ती वाढवा
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.