Special Report : श्रद्धा, अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले पुरोगामी राज्याचे अनेक मुख्यमंत्री

Special Report : बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मंत्रिमंडळाची बैठक रद्द केली आणि शिर्डी गाठली. इथे साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे सिन्नरमध्ये गेले आणि तिथे एका ज्योतिषाकडे त्यांनी हात दाखवल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राला ही बाब तशी नवीन नाही.

थोडं पण कामाचं
  • पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.
  • पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राला ही बाब तशी नवीन नाही.
  • यापूर्वी राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत.

Special Report : मुंबई : बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मंत्रिमंडळाची बैठक रद्द केली आणि शिर्डी गाठली. इथे साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे सिन्नरमध्ये गेले आणि तिथे एका ज्योतिषाकडे त्यांनी हात दाखवल्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा ज्योतिष शास्त्रावर विश्वास असल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राला ही बाब तशी नवीन नाही. (maharashtra chief ministers who believed in superstitious report in marathi)

यापूर्वी राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. त्यांनीही अशा प्रकारे कधीतरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वर्तन केल्याची चर्चा होती.  १९९५ साली शिवसेना भाजप युतीचे राज्य आले. तेव्हा शिवसेनेच्या मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. १९९५ साली मुंबईत गणपती दूध पितो अशी अफवा पसरली होती. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही गणपतीला दूध पाजले होते. आपण अंधश्रध्दाळू नाही परंतु आपली देवावर श्रद्धा आहे असे जोशी म्हणाले होते. तसेच गणपतीने आपल्या हातून दूध प्यायल्याचेही जोशी यांनी सांगितले होते.

१९९९ ते २०१४ पर्यंत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते. २००८ साली विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनीही राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सत्यसाईबाबा मुंबई दौर्‍यावर होते. वरळीच्या जांबोरी मैदानावर सत्यसाईबाबा यांचा कार्यक्रम होणार होता. त्यापूर्वी सत्यसाईबाबा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावर आले होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सत्यसाईबाबा यांचे भक्त होते. सत्यसाईबाबा हे एक भोंदू बाबा आहेत आणि हातचलाखीने ते हातातून सोने चांदीच्या वस्तू काढायचे असे अनेक आरोप सत्यसाईबाबा हयात असताना त्यांच्यावर झाले होते. अशा वेळी सत्यसाईबाबा वर्षा बंगल्यावर आले होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांची सेवा केली होती. यावेळी काँग्रेसह राष्ट्रवादीचेही काही मंत्री उपस्थित होते, यावेळीही वादंग निर्माण झाला होता.  

२०१९ साली शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथविधी उरकला होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीस यांनी मिरची हवन केला होता. लेखक आणि पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी आपल्या चेकमेट: हाऊ बीजीपी वन ऍन्ड लॉस्ट या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. उत्तराखंडमध्ये जेव्हा हरीश रावत मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीही असा मिरची हवन केला होता. त्यामुळे त्यांची खुर्ची वाचली होती असे फडणवीसांना सांगितले होते. त्यामुळे फडणवीस यांनी मध्य प्रदेशच्या एका मांत्रिकाकडून हा हवन केल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. इतकेच नाही तर शपथविधीवेळी फडणवीस यांनी आपले आवडते निळ्या रंगाच्या जॅकेट ऐवजी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. मांत्रिकाच्या सांगण्यावरूनच फडणवीसांनी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते असेही पुस्तकात म्हटले होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी