मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सर्वसामान्यांना गिफ्ट, सभागृहात केली मोठी घोषणा

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 04, 2022 | 16:47 IST

Maharashtra CM Eknath Shinde big announcement: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एक मोठी घोषणा केली आहे.

Maharahtra CM Eknath Shinde announces big decision in assembly which will give big relief for common people
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सर्वसामान्यांना गिफ्ट, सभागृहात केली मोठी घोषणा 
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभागृहात मोठी घोषणा
  • शिंदे सरकारच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणी घेण्यात आली. या बहुमत चाचणीत शिंदे-फडणवीस सरकारने (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) 164 मते मिळवत बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण करताना महत्त्वाची आणि मोठी घोषणा (Maharashtra CM Eknath Shinde big decision announced in session) केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्थिर सरकार आमचं आहे. आमचं संख्याबळ आणखी वाढेल. हे सरकार सुडबुद्धीने काम करणार नाही. मविआ सरकारने घेतलेले निर्णय आम्ही सरसकट बदलणार नाहीत. आपण विरोधी पक्ष म्हणून असं मनात आणू नका की, आमच्याकडून तुमच्यावर चुकीचं काम होईल, तर तसं अजिबात होणार नाही. सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार, राज्याचा सर्वांगिन विकास करणारं सरकार... सर्व प्रकल्प आपण मार्गी लावू. राज्याला प्रगतीपथाकडे नेणार आणि आवश्यक तिथं केंद्राची मदत घेऊ.

हे पण वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी दीपक केसरकरांना डुलकी?; VIDEO होतोय तुफान VIRAL

सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा

जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी केला होता. सर्व राज्यांनी व्हॅट कमी करावा अशी विनंती पंतप्रधानांनी केली होती. मात्र, काही राज्यांनी केली होती तर काहींनी केला नव्हता. आमचं युतीचं सरकार आता व्हॅट कमी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेईल आणि नागरिकांना दिलासा देईल. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 
विधीमंडळ विशेष अधिवेशन Live विधीमंडळ विशेष अधिवेशन Live Posted by Times Now Marathi on Monday, July 4, 2022

हिरकणीसाठी 21 कोटींचा निधी

रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे. ज्या हिरकणीने इतिहास घडवला. तो हिरकणी गाव वाचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 21 कोटींच्या निधीची घोषणा करतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, राज्यात सर्वाधिक महत्त्वाचा घटक बळीराजा आहे. या बळीराजासाठी राज्य सरकार इतकं करेल की शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्हाला करायचा आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचंही योगदान आम्हाला लागेल. शेतकरी आत्महत्यामुक्तीसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र मिळून काम करु.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी