Eknath Shinde Breaks down in Session: 'त्या' घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर, काय घडलं नेमकं? पाहा

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 04, 2022 | 19:15 IST

Maharashtra CM Eknath Shinde: महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव जिंकला. 

Maharashtra CM Eknath Shinde breaks down in assembly session watch video what happened exactly
Eknath Shinde Breaks down in Session: 'त्या' घटनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सभागृहात अश्रू अनावर, काय घडलं नेमकं? पाहा  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • 164 मते मिळवत एकनाथ शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला
  • महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय आम्ही सरसकट बदलणार नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 
  • सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार, राज्याचा विकास करणारं... सर्व प्रकल्प मार्गी लावणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजप यांचं सरकार आलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर राज्यपालांनी शिंदे सरकारला 4 जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ दिली होती. त्यानुसार आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारने (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिंदे सरकारच्या बाजुने 164 आमदारांनी मतदान केलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलखुलासपणे सभागृहात भाषण केलं. मात्र, त्याच दरम्यान एका घटनेच्या आठवणीने मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर झाले. (Maharashtra CM Eknath Shinde breaks down in session)

काय घडलं सभागृहात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्याच दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबासोबत घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला आणि आपल्या दोन मुलांच्या निधनाबाबत सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसैनिक हेच माझं कुटुंब मी मानलं. माझ्या आयुष्यात जेव्हा दु:खद प्रसंग आला.... माझी दोन मुलं डोळ्यासमोरुन गेली.... त्यावेळेस मला आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला. माझं कुटुंब उद्धवस्त झालं होतं. कशासाठी जगायचं आणि कुणासाठी जगायचं? मी ठरवलं होतं, माझा मुलगा श्रीकांत आणि पत्नी, आई-वडील यांच्यासाठीच जगतो. पण त्या दु:खातून आनंद दिघे यांनी मला सावरलं.

एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारण्याची कुणात हिंमत नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती आहे हे जितेंद्र आव्हाडांना सुद्धा माहिती आहे. 30-35 वर्षे एकनाथ शिंदे याने जीवाचं राण केलं आहे, रक्ताचं पाणी केलं. मी 17 वर्षांचा होतो, बाळासाहेबांच्या विचारांनी मला प्रेरित केलं आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणात धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भेट घेतली. मला वाटतं वयाच्या 18व्या वर्षी मी शिवसेनेच्या शाखेचा प्रमुख झालो. मी इतरांनी शाखाप्रमुख पद देण्याचं आनंद दिघेंना म्हटलं, पण मला त्यांनी शिवी दिली आणि शाखाप्रमुख पद दिलं असा किस्साही एकनाथ शिंदे यांनी सांगितला.

आमच्या डोक्यात 'ग' ची बाधा कधीच येणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, स्थिर सरकार आमचं आहे. 170 चं संख्याबळ आहे आणि ती संख्या आणखी वाढत राहणार. आमचं सरकार सुडबुद्धीने काम करणार नाही. ज्या ठिकाणी चुकीचं काही झालं असेल त्या बाबत देवेंद्रजी आणि मी ठरवू. आमच्या डोक्यात 'ग'ची बाधा कधीच येणार नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी