Aarey Metro Car Shed: आरे कारशेडचा मार्ग मोकळा, कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठवली

मुंबई
सुनिल देसले
Updated Jul 21, 2022 | 14:16 IST

Maharashtra Government lifts stay on Aarey Metro Car Shed construction: महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मेट्रो कारशेड संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Maharashtra CM Eknath Shinde lifts stay order on the construction of the mumbai metro 3 car shed at Aarey
आरे कारशेडचा मार्ग मोकळा, कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठवली 
थोडं पण कामाचं
  • आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा
  • आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मागे

CM Eknath Shinde lifts stay on Aarey Metro Car Shed : राज्यातील मविआ सरकार कोसळल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या शिंदे - भाजप सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. महाविकास आघाडी सरकारने मुंबईतील आरे (Aarey) कॉलनीत बनणाऱ्या मेट्रोच्या कारशेडला पर्यावरणाच्या मुद्द्यावरुन स्थगिती देत हा प्रकल्प कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथे हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टातही गेलं. पण राज्यात सत्तांतर झाल्यावर शिंदे-भाजप सरकारने (Eknath Shinde - BJP Government) ठाकरे सरकारचा (Thackeray Government) हा निर्णय बदलला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra CM Eknath Shinde lifts stay order on the construction of the mumbai metro 3 car shed at Aarey)

मेट्रो कारशेड आरे मध्येच होणार

मुंबईतील मेट्रोचं कारशेड आरे मध्येच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेडमध्ये असलेली स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. जेव्हा शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सुतोवाच केलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं राहुल द्रविडसोबत आहे खास नातं

मुंबईतील मेट्रोच्या कामात अनेक अडचणी येत होत्या. कारण, जोपर्यंत कारशेड होत नाही तोपर्यंत मेट्रो ३ प्रकल्पाच्या लाईन्स सुरू करण्यात अडचणी येत होत्या. पण आता मेट्रो कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता मेट्रोच्या रखडलेल्या प्रकल्पाला वेग येईल.

अधिक वाचा : 'शरद पवार' स्टाईलनं भरपावसात आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, पावसाळा झाल्यावर तातडीने मेट्रोच्या प्रकल्पाची कामे हाती घेतली जातील. तसेच वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा मानस शिंदे-भाजपचा असणार आहे आणि फास्ट ट्रॅकवर हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न नव्या सरकारचा असणार आहे.

माझ्यावर वार करा मुंबईवर नको - उद्धव ठाकरे

मुंबईतील मेट्रो तीनचं कारशेड हे आरे कॉलनीत करण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं, माझा चेहरा पडलेला दिसेल त्याच कारण म्हणजे मला दु:ख झालं असेल ते म्हणजे एका गोष्टीचं. माझ्यावर राग आहे ना मग माझ्यावर राग काढा. माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी