मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवत होते, समल्यावर उद्धव ठाकरे संतापले 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी गेल्यानंतर पंतप्रधानांचे सुरक्षा रक्षक आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

Breaking News
Breaking News: मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवत होते, समल्यावर उद्धव ठाकरे संतापले  
थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयएनएस शिक्रा येथे पोहोचले होते
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. 
  • तप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर मुंबईत विविध कार्यक्रमांसाठी दाखल झालेत.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयएनएस शिक्रा येथे पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे पोहोचल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. 

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या रक्षकांनी आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरवल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री असल्याने ते मुख्यमंत्र्यासोबत गेले होते. ऑइल पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकांनी आदित्य ठाकरेंना उतरविण्याचा प्रकार केल्याच्या घटनेनंतर  उद्धव ठाकरे भडकले असल्याचे समजते आहे. 

काय झालं नेमकं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर मुंबईत विविध कार्यक्रमांसाठी दाखल झालेत. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: हजर राहिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयएनएस शिक्रा येथे स्वागत केले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसोंबत आदित्य ठाकरे देखील निघाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे या प्रकारामुळं सुरक्षा व्यवस्थेवर खूप संतापल्याची माहिती आहे.


पंतप्रधान मोदी मुंबईत या कार्यक्रमांसाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार आहेत. जल भूषण इमारत हे १८८५ सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात आली आहे. सन २०१६ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनामध्ये एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश या भुयाराचा उपयोग करत होते. २०१९ साली या भुयाराचे नूतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होतील. हे वृत्तपत्र गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी