लवकरच कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभारु : मुख्यमंत्री

मुंबई
Updated Mar 25, 2020 | 14:28 IST

गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत सर्वांना या सणाच्या शुभेच्या दिल्यात. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या जनतेशी गप्पा मारल्या.

cm uddhav thackeray
लवकरच कोरोनावर मात करून विजयाची गुढी उभारु : मुख्यमंत्री  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबईः गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत सर्वांना शुभेच्या दिल्यात. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातल्या जनतेशी गप्पा मारल्या.  यावेळी त्यांनी राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे. कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकणार आहोत. आपण या संकटावर मात केल्यानंतर आपण विजयाची गुढी उभी करू, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोना म्हणजे हे जागतिक युद्ध आहे आणि या युद्धाची सर्वांना चांगलीच कल्पना आली आहे. या संकटाशी सामना करायचा असेल तर घरातच राहा. एसी बंद करा. खिडक्या उघडा. घरात मोकळी हवा येऊ द्या, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.  जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडे असतील. कोणत्याही वेळा नसणार आहेत. भाजीपाल्याची दुकाने बंद होणार नाहीत. कृपया गर्दी करू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

काल रात्री तुमची गोंधळाची परिस्थिती झाली होती. तुमची पळापळ झाली. त्यामुळे मी सकाळी तुमच्यासमोर आलो असतो तर पुन्हा तुम्ही घाबरला असता, म्हणून दुपारी आलो. पण मी तुम्हाला नकारात्मक काहीच सांगणार नाही. तर तुम्हाला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे, अशी सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली. 

कोरोनाच्या संकटामुळे अनेक अडचणी येत असल्या तरीही आता तुम्ही सर्व घरी आहात. घरात बसून कुटुंबियांसोबत आनंद घ्या,' असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं. तसंच मी घरात बसून काय करतो, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी घरी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्हीही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारकडून एसी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही आम्ही सुरु केले आहे. वर्ष दोन वर्ष चला हवा येऊ द्या मध्येच आहे. खिडक्या उघड्या ठेवा. बाहेरची खेळती हवा येऊ द्या. मोकळ्या हवेत श्वास घेऊ या. इकडे चला हवा येऊ द्या आधीपासूनच सुरु आहे.

एकूणच सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. 1971 चे युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहील पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

या निमित्ताने का होईना ना, कोरोनामुळे कुटुंबीय एकत्र येत आहेत, आपापले छंद जोपासत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. गमावलेले सर्व मिळविण्याचा प्रयत्न होत आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. जीवनावश्यक कामे सुरुच राहतील, भाजीपाला बंद होणार नाही, त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भाजी आणण्यासाठी एकट्यानेच जा, अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. शेती मालाची वाहतूक, शेतीची काम सुरू राहील. फक्त गरजेपुरते बंद ठेवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...