अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

CM Uddhav Thackeray on Solapur tour: राज्यातील विविध भागांत झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री दौरा करणार

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अतिवृष्टीमुळे मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर जाणार, अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करुन घेणार आढावा

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून  शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार (१९ ऑक्टोबर) रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. गेल्या आठ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान, पूर परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यासाठी ते सोलापुरचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

  1. सकाळी ९ वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
  2. सकाळी ९.३० वाजता सोलापूर येथून मोटारीने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे), सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा.
  3. सकाळी ११ वाजता सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी ११.१५ वाजता अक्कलकोट शहराकडे प्रयाण, सकाळी ११.३० वाजता अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी ११.४५ वाजता अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,
  4. दुपारी १२ वाजता रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
  5. दुपारी १२.१५ वाजता रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,
  6. दुपारी १२.३० वाजता बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,
  7. दुपारी १२.४५ वाजता बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,
  8. दुपारी ३ वाजता पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागतांच्या भेटी  व नंतर  सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा : मुख्यमंत्री

राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत रहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले. पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी