Maharashtra corona guidelines for Gudi Padwa : गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारचे नवे नियम

Gudi Padwa guidelines : गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

Maharashtra corona guidelines and rules for Gudi Padwa
गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारचे नवे नियम जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

  • मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे.
  •  या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण (Gudi Padwa) साजरा करावा असे  अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.
  • मराठमोळा सण असलेला गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे.

Maharashtra corona guidelines for Gudi Padwa, मुंबई : मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे.  या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण (Gudi Padwa) साजरा करावा असे  अपेक्षित असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आलीय. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही सरकारकडून ( State Government) स्पष्ट करण्यात आलंय. 

गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करा

मराठमोळा सण असलेला गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे यंदाही 13 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा सण साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं शासन आदेशानुसार सूचित करण्यात आलंय. राज्यात काही ठिकाणी गुढीपाडवा हा सण पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो.

शोभा यात्रा, बाईक मिरवणुका काढू नका 

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली आणि मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिन्स्टन्सिंगचे आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून घरगुती गुढी उभारून सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.

आरोग्यविषयक उपक्रम परवानगीनेच 

गुढीपाडवा सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/ रक्तदान शिबिरे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आयोजित करता येतील. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृतीही करता येईल. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी