महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरू

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jan 03, 2023 | 12:38 IST

strike of resident doctors continues for the second day in a row in Maharashtra : महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.

strike of resident doctors continues for the second day in a row in Maharashtra
महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरू
  • मुंबईतील सुमारे 2 हजार आणि राज्याच्या उर्वरित भागातील सुमारे 6 हजार निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले
  • निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड'च्या प्रमुख मागण्या

Maharashtra Doctors on Strike, strike of resident doctors continues for the second day in a row in Maharashtra : महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांचा (Maharashtra Medical Association of Resident Doctors or Maharashtra Association of Resident Doctors - MARD / मार्ड) संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. मुंबईतील सुमारे 2 हजार आणि राज्याच्या उर्वरित भागातील सुमारे 6 हजार निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ओपीडी (Outpatient Department) तसेच ऑपरेशन्सशी (Operations) संबंधित कामकाजावर परिणाम झाला आहे.

मुंबईतील जेजे, नायर, केईएम, कूपर, सायन या मोठ्या हॉस्पिटलसह राज्यातील अनेक शासकीय हॉस्पिटलमधील कामकाजावर डॉक्टरांच्या संपाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील 22 सरकारी हॉस्पिटलमधील सुमारे 8 हजार निवासी डॉक्टर संपावर आहेत. यामुळे सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांचा वेग मंदावला आहे. सरकारी हॉस्पिटलमधील अनेक वैद्यकीय सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक रुग्णांची ऑपरेशन पुढे ढकलण्यात आली आहेत. रुग्णांचे आणि त्यांच्या नातलगांचे हाल होत आहेत. पण मागण्या मान्य झाल्या नाही तर संप आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे. तर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन संपावर लवकरच मार्ग काढू असे आश्वासन दिले आहे. 

January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

महाराष्ट्र शासनाने दारू विकून केली घसघशीत कमाई, 9 महिन्यात मिळवला 14 हजार 480 कोटींचा महसूल

निवासी डॉक्टरांची संघटना 'मार्ड'च्या प्रमुख मागण्या

  1. निवासी डॉक्टरांचे 2018 पासूनचे थकीत वेतन द्या आणि वरिष्ठ डॉक्टरांची पदभरती करा
  2. राज्यातील 1 हजार 432 निवासी डॉक्टरांची नवी पदनिर्मिती करा
  3. राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांसाठी समान वेतन श्रेणी लागू करावी
  4. शासकीय वैद्यकीय वसतिगृह आणि स्वच्छतागृहांची दूरवस्था, अपुऱ्या सुविधांमुळे निवासी डॉक्टरांचे हाल होत आहेत. या समस्येतून मार्ग काढावा
  5. वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या तुलनेत वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या प्राध्यापकांच्या संख्येत वाढ करावी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी