Maharashtra earned revenue of 14 thousand 480 crores in 9 months from liquor sale : महाराष्ट्र शासनाने दारू विकून 9 महिन्यात 14 हजार 480 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल 2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीतील आहे. राज्याला दारू विक्रीतून आधी मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत यंदा 30 टक्के जास्त महसुली उत्पन्न झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही माहिती दिली.
महाराष्ट्रात 2021-22 या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 25 कोटी लिटर देशी दारू आणि 23.5 कोटी लिटर विदेशी दारू विकण्यात आली. या उलट एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान महाराष्ट्रात 34.5 कोटी लिटर देशी दारू आणि 17.5 कोटी लिटर विदेशी दारू विकण्यात आली.
उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या आठ महिन्यांत 23 कोटी लिटर बीअर विकण्यात आली. याआधी एप्रिल ते नोव्हेंबर 2021 मध्ये 21 कोटी लिटर बीअर विकण्यात आली. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या काळात महाराष्ट्रात 88 लाख लिटर वाईनची विक्री झाली. याआधी एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या काळात महाराष्ट्रात 66 लाख लिटर वाईनची विक्री झाली.
महाराष्ट्राला 2021-22 या आर्थिक वर्षात दारू विकून 17 हजार 117 कोटी रुपयांचा महसूल कमावता आला होता. यंदा म्हणजेच 2022-23 या आर्थिक वर्षातील 1 एप्रिल 2022 ते 26 डिसेंबर 2022 या 9 महिन्यांच्या कालावधीत राज्याने 14 हजार 480 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. यामुळे यंदा राज्याचा उत्पादन शुल्क विभाग दारू विक्रीतून २२ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट साध्य करेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Pausha Putrada Ekadashi 2023 : कधी आहे 2023 मधील पहिली एकादशी?
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.