मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या ३६ पंचायत समित्यांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.